मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची नवी याचिका, केली ही मोठी मागणी!

On: November 2, 2023 6:24 PM
Gunratna Sadavarte
---Advertisement---

मुंबई | सध्या राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. अशातच प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीवर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. शांततेत चालू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर याचे पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्तेंनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ८ नोव्हेंबरला सुनावणी पार पडणार आहे.

काही दिवसापुर्वी मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या होत्या. त्यानंतर ते आक्रमक झाले होते. त्यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटलांना लक्ष्य केलं. शेवटच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणाच्या विरोधात लढणार असल्याचा त्यांनी प्रण केला.

यापूर्वी राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. त्यावेळी सदावर्तेंनी त्या आरक्षणाला  उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकलं होतं. त्यानंतर सदावर्तेंनी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाला आव्हान दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकू शकलं  नाही.

गुणरत्न सदावर्ते सातत्याने मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांच्या विरोधात कारवाईची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा मराठा समाज त्यांच्या विरोधाच आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच न्यायालय यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महात्वाच्या बातम्या- 

मराठा आरक्षणावर अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य; नव्या वादला तोंड फुटण्याची शक्यता

दुसऱ्याच चेंडूनं केला घात!, वानखेडेवर हजारो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला!

“…अन् सगळेजण मला वाईट म्हणतील!”, रोहित शर्मा असं का म्हणाला?

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! ‘या’ कारणामुळे संपूर्ण कुटुंबाची बदनामी

Join WhatsApp Group

Join Now