गुणरत्न सदावर्तेंच्या अंगावर शाईफेक, पत्रकार परिषदेत मोठा राडा

On: November 26, 2022 5:39 PM
---Advertisement---

सोलापूर | सध्या राज्यात सीमाप्रश्नाचा वाद उफाळला आहे. यावर गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडत होते. यावेळी मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

सदावर्तेंच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तिने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी या व्यक्तिला पकडलंय.

यावेळी त्यांच्यामागे उभ्या असलेल्या अन्य एका व्यक्तीने आपल्या खिशातून शाई काढून सदावर्तेंच्या अंगावर फेकली. तसेच काळे कापड दाखवत घोषणाबाजी केली.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून काळी पावडर फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर सदावर्ते पत्रकार परिषद घेत असताना जोरदार घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

हे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेड संघटनेचे आहेत. त्यांनी गुणरत्न सदावर्ते महाराष्ट्राचे तुकडे करत असल्याचा आरोप केला. तसेच सदावर्तेंच्या वेगळ्या राज्यांच्या मागण्यांचा निषेध नोंदवला.

सदावर्तेंनी मराठा आरक्षणालाही विरोध केल्याचा मुद्दा उपस्थित करत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्तेंचा जाहीर निषेध अशीही घोषणाबाजी यावेळी झाली.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now