Greater Noida Stadium l न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना ग्रेटर नोएडा स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता, मात्र आता या मैदानाच्या दुरवस्थेचे पडसाद संपूर्ण क्रिकेट विश्वात उमटले आहेत. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मैदानाची दुरवस्था झाली असून जागतिक दर्जाच्या सुविधांचा तीव्र अभाव जाणवू लागला आहे. आता जेवणाच्या सुविधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच आता एका नवीन फोटो समोर आला आहे, ज्यात दिसत आहे की स्वयंपाक करण्यासाठी वॉशरूममधून भांड्यात पाणी भरले जात आहे.
स्वयंपाक करण्यासाठी वॉशरूममधून भांड्यात पाणी भरले :
संपूर्ण ग्राउंड स्टाफ अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात गोष्टी पूर्ण करण्यात व्यस्त आहे. एकीकडे स्टेडियम कोरडे करणे ही ग्राऊंड स्टाफसाठी मोठी समस्या असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता स्वयंपाकी वॉशरुमच्या वॉश-बेसिनमध्ये भांडी धुताना दिसत आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच मैदानाच्या सुविधांबाबत आक्षेप घेतला आहे.
यासंदर्भात क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “येथे सुविधा नावाची कोणतीही गोष्ट नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा इथे यायचे नाही. त्याऐवजी आम्ही लखनौच्या मैदानाला प्राधान्य देऊ.” एसीबीच्या या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, या मैदानात सामान्य सुविधाही उपलब्ध नाहीत. येथे व्यवस्थापन नावाची गोष्ट नाही आणि खेळाडूही सुविधांबाबत खूश नाहीत.
Greater Noida Stadium l सलग दुसऱ्या दिवशी सामना रद्द :
गेल्या 10 दिवसांपासून उत्तर भारतात सतत पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत ग्रेटर नोएडाचे मैदान पाण्याने भिजले होते. मैदान ओले असल्याने पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. तसेच नाणेफेकही झाले नाही. तसेच तेथे पुन्हा मुसळधार पाऊस पडला, पण मैदानावरील कर्मचारी दुसऱ्या दिवशीही खेळपट्टी आणि मैदान कोरडे करू शकले नाहीत. त्यामुळे दुसरा दिवसही रद्द म्हणून घोषित करण्यात आला आहे.
News Title –Greater Noida Stadium Caterer Using Washroom Water
महत्त्वाच्या बातम्या-
देशाचा गृहमंत्री असताना काश्मीरला जाताना माझी XXX’, सुशीलकुमार शिंदे यांचं धक्कादायक वक्तव्य
मी शहीद होण्यास तयार; मनोज जरांगेंच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ
ग्लॅमरस विश्वातील धक्कादायक सत्य समोर; दिया मिर्झाचा मोठा खुलासा
मुलीच्या लग्नाची चिंता विसरा, आता सरकार देणार आर्थिक मदत; काय आहे कन्यादान योजना?
तुम्हाला PM किसान निधीचा 18 वा हप्ता घ्यायचायं? तर ही गोष्ट आजच करा






