Gram Panchayats strike l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली. या घटनेला आज एक महिना होत आहे. मात्र संतोष देशमुखांच्या या हत्येमुळे राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. कारण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तसेच त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यातील विविध भागात आक्रोश आंदोलनं होत आहेत.
राज्यभरातील ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन :
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज राज्यभरातील ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन सुरू आहे. याप्रकरणी अखिल भारतीय सरपंच परिषद आक्रमक झाली आहे. तसेच अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून काम बंद आंदोलनाची सुरुवात आज केली आहे.
आज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव ग्रामपंचायतीमधून काम बंद आंदोलनाला अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने सुरुवात करण्यात आली आहे.
Gram Panchayats strike l धाराशिव जिल्ह्यातील सरपंचानी केली मोठी मागणी :
यावेळी राज्यभरातील ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या हत्येचा निषेध नोंदवला आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील सरपंचांनी गाव पातळीवरील सरपंचासाठी वेगळा संरक्षण कायदा राज्य सरकारने करावा अशी मोठी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, भुसावळसह राज्यातील सर्वच ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमधून केली जात आहे. तसेच आज ग्रामपंचायतीचे कामकाज देखील बंद ठेवण्यात आले आहे.
News Title : Gram Panchayats strike across the state
महत्वाच्या बातम्या –
शेतकऱ्यांनी आता शेती करणं सोडून द्यायचं का?, खतांच्या किंमती पुन्हा वाढल्या
HMPV व्हायरस संदर्भात समस्या असल्यास ‘या’ टोल फ्री नंबरवर संपर्क करा!
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, बीडमधील रुग्णालयात उपचार सुरू
नागपूर शहरातील पाणी पुरवठा ‘या’ दिवशी बंद राहणार
आता पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरही वेश्याव्यवसाय सुरु, आमदाराची तक्रार






