शेतकऱ्यांनो खरीप हंगामासाठी आल्या ‘या’ योजना; अर्ज कसा करणार?

On: June 16, 2024 11:49 AM
Government Schemes for farmers
---Advertisement---

Government Schemes for farmers | भारतीय पिकांच्या हंगामाचे वर्गीकरण हे मुख्यतः दोन हंगामामध्ये करण्यात येते. एक खरीप हंगाम आणि दुसरा रब्बी हंगाम. नैऋत्य मौसमी किंवा उन्हाळी पावसादरम्यान असलेला कालावधी म्हणजेच जुलै ते ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीदरम्यान घेतल्या जाणाऱ्या पिकांना खरीप हंगाम म्हणतात.

आता खरीप हंगाम सुरू झाला आहे. मॉन्सून देखील महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे करण्यास सुरुवात केली आहे. अशात खरीप हंगाममधील काही सरकारी योजना आहेत, ज्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने अर्ज करायलाच हवा. याबाबत खाली सविस्तर माहिती दिली आहे.

खरीप हंगामसाठी सरकारी योजना

पंतप्रधान पीक विमा योजना : केंद्र शासनाची ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याची आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याने फक्त 1 रुपया भरुन आपले नाव नोंद करायचे आहे. विमा हप्त्याची रक्कम ही केंद्र शासन भरणार आहे. शेतकऱ्याने आपल्या आधार कार्डची प्रत, 7/12 उतारा, बँक पासबूक झेरॉक्स, पीक पेरणी स्वयंघोषणा पत्र घेऊन आपल्या जिल्ह्यातील किंवा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नाव नोंदणी करावी.

अन्न आणि पोषण सुरक्षा : अन्नधान्य पिके (भात, कडधान्य, भरडधान्य (मका), पौष्टिक तृणधान्य व TRFA कडधान्य) या योजनेंतर्गत या पिकांची पीक प्रात्याक्षिके राबविली जातात. शेतकऱ्यांचा आर्थिक (Government Schemes for farmers) स्तर उंचावणे, हा या योजनेचा मुख्य हेतु आहे.

कृषी यांत्रिकीकरण : कृषी उत्पादन प्रक्रियेत अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहीत करणे, हे प्रमुख उद्देश साध्य करण्यासाठी राज्यात कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि ट्रॅक्टर सोबत चालणारी औजारे, ठिबक आणि तुषार सिंचन सेट, शेडनेट, पॉली हाऊस या गोष्टींसाठी अनुदान दिले जाते.  शेतकरी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या साईटवर अर्ज करू शकतात.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना: शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, पीक रचनेत बदल घडवून आणणे, हे प्रमुख उद्देश साध्य करण्यासाठी 100 टक्के अनुदानावर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकत नाहीत असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याचे अर्ज सुरू झाले आहेत. शेतकरी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या साईटवर यासाठी अर्ज करू शकतात.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेंतर्गत, गांडूळ खत युनिट, बांबू लागवड, फळबाग लागवड, नाडेप कंपोस्ट युनिट बनवणे, इतर लाभ (Government Schemes for farmers) दिले जातात.

News title –  Government Schemes for farmers

महत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?; जाणून घ्या आजच्या लेटेस्ट किंमती

आज ‘या’ राशींवर लक्ष्मी प्रसन्न होईल, मोठा धनलाभ होणार

राज्यात येत्या 48 तासात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी

धनंजय मुंडेंनी केलं पीडित कुटुंबीयांचं सांत्वन, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली

“इटलीमध्ये जाऊन मोदींचा थाट, पण मणिपूरकडे पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”

Join WhatsApp Group

Join Now