केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी असणार सुट्ट्या

On: November 29, 2025 5:12 PM
Holiday List 2026
---Advertisement---

Holiday List 2026 | केंद्र सरकारने वर्ष 2026 साठी सरकारी कार्यालये, बँका आणि शैक्षणिक संस्थांसाठी लागू होणाऱ्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. प्रत्येकवर्षी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी सुट्टी असेल, याची उत्सुकता असते. यावर्षीही कार्मिक विभागाने महिनानिहाय सुट्ट्यांची सविस्तर माहिती देत एकूण 14 अनिवार्य (राजपत्रित) आणि 12 वैकल्पिक (प्रतिबंधित) सुट्ट्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे येत्या वर्षात कोणते दिवस सुट्टीचे असणार आहेत याचा स्पष्ट आराखडा आता समोर आला आहे. (Government Holidays 2026)

दिल्ली आणि नवी दिल्लीतील केंद्रीय कार्यालयांसाठी 12 पैकी 3 वैकल्पिक सुट्ट्या कार्मिक विभाग निवडतो, तर इतर राज्यांमध्ये स्थानिक प्रशासन त्या 3 सुट्ट्या ठरवते. सरकारी कर्मचाऱ्यांना अनिवार्य सुट्ट्यांव्यतिरिक्त स्वतःच्या पसंतीने 2 वैकल्पिक सुट्ट्या घेण्याची मुभा आहे. राज्यांनुसार काही बदल होऊ शकतात, त्यामुळे संबंधित राज्य सरकारच्या अधिसूचना पाहणे आवश्यक आहे.

सुट्ट्यांची यादी स्पष्ट :

जानेवारी महिन्यात १ जानेवारीला नववर्ष (वैकल्पिक), १४ जानेवारीला मकरसंक्रांती, पोंगल आणि २३ जानेवारीला बसंत पंचमी अशा सुट्ट्या आहेत. याशिवाय २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हा अनिवार्य राजपत्रित सुट्टीचा दिवस आहे. फेब्रुवारीत गुरु रविदास जयंती, दयानंद सरस्वती जयंती, महाशिवरात्र आणि १९ फेब्रुवारीला शिवजयंती या वैकल्पिक सुट्ट्या असतील.

मार्च महिन्यात होळी (४ मार्च) ही अनिवार्य सुट्टी, तर होलिका दहन, चैत्र शुक्ल प्रतिपदा, उगाडी, चेटी चंद या वैकल्पिक सुट्ट्या मिळणार आहेत. २१ मार्चला ईद-उल-फित्र आणि २६ मार्चला रामनवमी ही महत्त्वाची अनिवार्य सुट्ट्या आहेत. एप्रिलमध्ये ३ एप्रिलला गुड फ्रायडे आणि ३१ मार्चला महावीर जयंती या सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. मे महिन्यात बुद्ध पौर्णिमा आणि २७ मे रोजी बकरीद (ईद-उल-झुहा) ची अनिवार्य सुट्टी असेल.

जून महिन्यात २६ जूनला मोहरम ही अनिवार्य सुट्टी असणार आहे, ज्यामुळे वर्षाच्या पहिल्या सहामाहीत धार्मिक सणांच्या सुट्ट्यांची मालिका दिसून येते.

Holiday List 2026 | स्वातंत्र्यदिन, दिवाळी, ख्रिसमससह मोठ्या सुट्ट्या जाहीर :

जुलै महिन्यात १६ जुलैला रथयात्रा (वैकल्पिक) सुट्टी जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यात १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन हा अनिवार्य राजपत्रित सुट्टीचा दिवस असून, २६ ऑगस्टला ईद-ए-मिलाद तसेच ओणमसाठीही वैकल्पिक सुट्टी जाहीर केली आहे. २८ ऑगस्टला रक्षाबंधनची वैकल्पिक सुट्टीही मिळणार आहे.

सप्टेंबरमध्ये ४ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी (अनिवार्य) आणि १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी (वैकल्पिक) या सुट्ट्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती, विजयादशमी, महाअष्टमी, सप्तमी, करवा चौथ आणि महर्षी वाल्मिकी जयंती अशा सलग धार्मिक व सांस्कृतिक सुट्ट्या लागू होणार आहेत. (Optional Holidays 2026)

नोव्हेंबरमध्ये दीपावलीचा मुख्य दिवस म्हणजे नरक चतुर्दशी (८ नोव्हेंबर) ही अनिवार्य सुट्टी आहे. यानंतर गोवर्धन पूजा, भाऊबीज आणि छठ पूजा या वैकल्पिक सुट्ट्या मिळतील. २४ नोव्हेंबरला गुरु नानक जयंती ही अनिवार्य सुट्टी घोषित झाली आहे. अखेरच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये २५ डिसेंबरचा ख्रिसमस हा अनिवार्य दिवस असून, २४ डिसेंबरला ख्रिसमस इव्ह आणि २३ तारखेला हजरत अली जन्मदिवस हे वैकल्पिक दिवस असतील. (Holiday List 2026)

केंद्र सरकारकडून जाहीर केलेली ही यादी सरकारी कर्मचारी, बँका, शाळा-कॉलेज यांसाठी विशेष महत्त्वाची आहे. राज्यांनुसार काही सण वेगळ्या तारखांना साजरे होऊ शकतात, त्यामुळे राज्य सरकार वेळोवेळी सुट्ट्यांच्या अधिसूचना जाहीर करणार आहे. नवीन वर्ष जवळ आल्याने नागरिकांना आता आपल्या कामांचे, प्रवासाचे आणि कौटुंबिक नियोजनाचे प्लॅनिंग अधिक सोप्या पद्धतीने करता येणार आहे.

News Title: Government Holiday List 2026: Full Gazetted & Optional Holidays Announced by Central Government

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now