Gold-Silver Rate Today | एप्रिल महिन्यात सोन्याने दरवाढीचे अनेक विक्रम तोडले. पहिल्यांदाच जळगावच्या सराफा बाजारात जीएसटीसह सोन्याच्या किंमतीने 76 हजारांचा टप्पा ओलांडला होता. गेल्या आठडव्यात सोन्याने 2,400 डॉलर प्रति औंसपेक्षा अधिक उसळी घेतली होती. आज ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात तब्बल 2140 रुपयांची वाढ झाली. 15 एप्रिल रोजी 600 रुपयांनी सोनं वधारलं. 17 एप्रिलला भाव जैसे थे होता. 18 एप्रिल रोजी सोनं 330 रुपयांनी स्वस्त झालं. तर 20 एप्रिल रोजी 100 रुपयांनी किंमती उतरल्या. या आठवड्यात सोनं 550 रुपयांनी उतरलं आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 67,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्यात खूप नाही पण, काही अंशी नरमाई आली आहे. त्यामुळे ग्राहकांना थोडा तरी दिलासा मिळाला आहे.
चांदीचा मोठा दिलासा
गेल्या आठवड्यामध्ये चांदीच्या किंमतीमध्ये जराही घट झाली नाही. 15 एप्रिल रोजी चांदी 500 रुपयांनी वधारली. 16 एप्रिल रोजी त्यात 1000 रुपयांची वाढ झाली. 17 एप्रिल (Gold-Silver Rate Today) रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 18, 19 आणि 20 एप्रिल रोजी चांदीने दरवाढीला ब्रेक दिला. तर या आठवड्यात पहिल्याच दिवशी चांदीत 1 हजारांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,500 रुपये आहे.
‘असा’ असेल कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 72,875 रुपये, 23 कॅरेट 72,583 रुपये, 22 कॅरेट सोने 66,754 रुपये झाले. 18 कॅरेट 54,656 रुपये, 14 कॅरेट सोने 42,632 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.
वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय (Gold-Silver Rate Today) बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
News Title- Gold-Silver Rate Today April 23
महत्वाच्या बातम्या-
ट्रोलिंगमुळे हार्दिक पांड्याचे मानसिक संतुलन बिघडले!, नव्या गौप्यस्फोटाने खळबळ
मालिकेतील सतत रडण्यामुळे अरुंधतीला झाला होता ‘हा’ आजार, पहिल्यांदाच केला खुलासा
मराठमोळ्या ऋतुराजची पलटण केएल राहुलला धक्का देणार? CSK Vs LSG संघ आज भिडणार
सूरतमध्ये नवा ट्विस्ट, गुलाल उधळला, मात्र काँग्रेसच्या मागणीनं भाजपच्या आनंदावर पाणी?
धक्कादायक!!!, बारामतीत आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?






