ग्राहकांना श्रावण पावला! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव

On: August 9, 2024 12:02 PM
Gold Rate
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोने-चांदीचे दर घसरले आहेत. या आठवड्यात मौल्यवान धातूमध्ये पडझड दिसून आली. आतापर्यंत 1300 रुपयांनी सोने स्वस्त झाले आहे. तर, चांदीमध्ये तब्बल 4000 पेक्षा जास्त घसरण झाली आहे. त्यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ पुन्हा वाढली (Gold-Silver Rate Today) आहे.

सोने-चांदीचे आजचे दर

6 ऑगस्टरोजी सोन्याचे भाव 870 रुपयांनी घसरले. 7 ऑगस्ट रोजी किंमती 440 रुपयांनी उतरल्या. काल कोणताही बदल दिसला नाही. मात्र, आज 8 ऑगस्टरोजी घसरणीचे संकेत मिळत आहेत. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 63,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

या आठवड्यात चांदीने खूप दिलासा दिला आहे. गेल्या आठवड्यात चांदीने 3200 रुपयांची भरारी घेतली होती. तर या आठवड्यात चांदी 4200 रुपयांनी स्वस्त झाली. 6 ऑगस्टला किंमती 3200 (Gold-Silver Rate Today)रुपयांनी कमी झाल्या. त्यात सलग दोन दिवस 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 81,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 69,205, 23 कॅरेट 68,928, 22 कॅरेट सोने 63,392 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,904 रुपये, 14 कॅरेट सोने 40,485 रुपये प्रति 10 (Gold-Silver Rate Today) ग्रॅमवर उतरले आहे.

घरबसल्या जाणून घ्या भाव-

दरम्यान, तुम्ही सोने आणि (Gold-Silver Rate Today) चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

News Title : Gold-Silver Rate Today 9 August 2024

महत्त्वाच्या बातम्या-

“विनेश फोगाटचं पदक घालवायला भाजप कारणीभूत”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

सतर्क! आज राज्यातील 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

“खोके सरकारला शेख हसीना यांच्यासारखं पळवून..”; संजय राऊतांचा हल्लाबोल

नागपंचमी सणाला नागदेवतांची पूजा ‘या’ वेळेपर्यंत करा; मिळतील शुभ संकेत

नागदेवता या दोन राशींवर होणार प्रसन्न; मिळणार आनंदाची बातमी

Join WhatsApp Group

Join Now