Gold-Silver Rate Today | केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आणि नंतर सोने-चांदीच्या किमतीमध्ये मोठे बदल झाले. मौल्यवान धातूच्या किंमतीत विक्रमी घसरण झाली. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढ दिसून आली. मात्र, दुसऱ्याच इवशी किमती खाली उतरल्या. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळच्या(Gold-Silver Rate Today) सत्रात घसरणीचे संकेत दिसून आले.
सोने-चांदीच्या किमती
या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याची किंमत 270 रुपयांनी वाढली. मंगळवारी भाव 210 रुपयांनी उतरले. आज सकाळी पुन्हा किमती कमी झाल्या आहेत. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आता 22 कॅरेट सोने 63,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या आठवड्यात चांदीने देखील मोठा दिलासा दिला आहे. सोमवारी चांदीत 500 रुपयांची दरवाढ झाली. मंगळवारी दुसऱ्या दिवशी तितकीच घसरण झाली. आज सकाळी (Gold-Silver Rate Today) पुन्हा चांदीच्या किमती घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 68,680, 23 कॅरेट 68,405, 22 कॅरेट सोने 62,911 रुपये, 18 कॅरेट आता 51,510 रुपये, 14 कॅरेट सोने 40,178 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय (Gold-Silver Rate Today) बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क नसते. तसेच सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
News Title : Gold-Silver Rate Today 31 july 2024
महत्त्वाच्या बातम्या-
“प्रचंड असह्य वेदना..”; किरण माने आयसीयूमध्ये दाखल
पवित्र श्रावणात ‘या’ ज्योतिर्लिंगांचं घ्या दर्शन; IRCTC चे टूर पॅकेज एकदा बघाच
Paris Olympics मध्ये भारताच्या खात्यात दुसरं पदक; नेमबाजीत ‘या’ जोडीने रचला इतिहास
राज ठाकरेंना ‘सुपारीबाज’ म्हणणाऱ्या अमोल मिटकरींवर मनसैनिकांकडून हल्ला; अकोल्यात प्रचंड गोंधळ
“…तर उद्या एखादा दहशतवादीही नाव बदलून भेटायला येईल”; सुप्रिया सुळे संतापल्या






