अबब! सोनं पोहोचलं 80 हजारांवर?, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड

On: September 27, 2024 11:52 AM
Gold-Silver Rate Today 27 September 2024
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील सोने आणि चांदी सुसाट आहेत. या सणासुदीच्या काळात दोन्ही धातूंनी दरवाढीचा नवीन टप्पा गाठला आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात सोनं पहिल्यांदाच 70 हजारांच्या पार गेल्याचं दिसून आलं. मात्र, या सप्टेंबर महिन्यात सोनं जवळपास 80 हजारांवर आलं आहे. (Gold-Silver Rate Today )

गेल्या दहा दिवसांत सोन्यामध्ये 1800 रुपयांपेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली आहे. या आठवड्यात 23 सप्टेंबर रोजी सोने 220 रुपयांनी तर मंगळवारी 210 रुपयांनी किंमती वधारल्या. 25 सप्टेंबर रोजी दर 660 रुपयांनी वाढले. आज 27 सप्टेंबररोजी देखील दरवाढ नोंदवली गेली.

आजचे सोने-चांदीचे दर

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आता 22 कॅरेट सोने 70,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,170 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आगामी काही दिवसांत सोने आणखी महाग होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. (Gold-Silver Rate Today )

मागील दहा दिवसात चांदीमध्ये देखील 5000 रुपयांची वाढ झाली. 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी किंमती स्थिर होत्या. तर 25 सप्टेंबर रोजी चांदीमध्ये 2000 रुपयांची वाढ झाली. आज सकाळच्या सत्रात देखील चांदीमध्ये दरवाढीचे संकेत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.

22 आणि 24 कॅरेटमधील फरक काय?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध सोने मानले जाते. 22 कॅरेट सोने तांबे, चांदी, जस्त यांसारखे 9% इतर धातू जोडून तयार केले जाते. 24 कॅरेट सोने चमकदार असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. (Gold-Silver Rate Today )

News Title – Gold-Silver Rate Today 27 September 2024

महत्त्वाच्या बातम्या-

‘बदला पुरा’; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी फडणवीसांचं रोखठोक भाष्य!

धक्कादायक! पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार

‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांवर पुन्हा शोषणाचे आरोप, ‘या’ अभिनेत्रीने सोडली मालिका

भाजपकडून अजितदादा गटाची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?, ‘या’ नेत्याला केंद्रात मिळाली मोठी जबाबदारी

लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, योजनेसाठी अर्ज करण्यास मिळणार मुदतवाढ?

Join WhatsApp Group

Join Now