Gold-Silver Rate Today | या आठवड्यात सोन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. आज 27 जूनरोजी मात्र, ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय वायदे बाजारातील विक्रमी उच्चांकावरून सोन्याच्या किमती जवळपास 4,000 रुपयांनी घसरल्या आहेत.
एमसीएक्सवर सोने 270 रुपयांनी घसरल्याने 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 71,730 रुपये इतके झाले आहे. चांदीने देखील मोठा दिलासा दिला आहे. चांदीच्या किमतीही कमी झाल्या आहेत.
जाणून घ्या आजच्या सोने-चांदीच्या किमती
चांदी 385 रुपयांनी घसरून 86850 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. काल चांदीचे दर 86,965 रुपये होते. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये सोन्याचे भाव रॉकेटच्या तेजीत होते. या दोन महिन्यात सोन्याने उच्चांकी भरारी घेतली होती.
सध्या जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या महिन्यात सोनं जवळपास 4 हजारांपर्यंत खाली घसरले आहे. चांदीने देखील 96,000 हजारांचा टप्पा मेमध्ये पार केला होता. या महिन्यात (Gold-Silver Rate Today) चांदीमध्येदेखील जवळपास 10,000 रुपयांची घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या मजबूतीमुळे आणि रोखे उत्पन्नात वाढ झाल्यामुळे मौल्यवान धातूच्या किमती घसरल्या आहेत. या आठवड्यामध्ये स्पॉट गोल्ड 0.8 टक्क्यांनी घसरून 2,301 डॉलरवर पोहोचला होता. 10 जूननंतरचा हा निच्चांकी स्तर आहे.
जाणून घ्या कॅरेटचे भाव
10 ग्रॅम सोन्याचे 22 कॅरेटचे दर 65, 750 रुपये आहे. तर, 24 कॅरेटचे दर 71, 730 रुपये, 18 कॅरेटचे दर 53,800 रुपये झाले आहे. तुम्हाला जर 24 कॅरेटचे 1 ग्रॅम सोने खरेदी करायचे (Gold-Silver Rate Today) असेल तर यासाठी तुम्हाला 7,173 रुपये मोजावे लागतील.
News Title : Gold-Silver Rate Today 27 june 2024
महत्त्वाच्या बातम्या-
…तर टीम इंडिया 16 महिन्यानंतर इंग्लंडचा वचपा काढणार?
पुणेकरांनो ‘या’ गोष्टी करताना शंभर वेळा विचार करा; पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये
देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या पराभूत उमेदवारांना दिल्या ‘या’ महत्वपूर्ण सूचना
लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; तात्काळ रुग्णालयात केलं दाखल






