Gold-Silver Rate Today | एप्रिल आणि मे या दोन महिन्यात मौल्यवान धातूने अनेक रेकॉर्ड मोडले. या दोन महिन्यात सोनं पहिल्यांदाच 75 हजारांच्याही पुढे गेलं होतं. त्यानंतर जून आणि जुलै महिन्यात काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. ऑगस्ट महिन्यात देखील किमती खाली आल्या होत्या. मात्र, सप्टेंबर महिन्यात सोनं पुन्हा भरारी घेताना दिसून येत आहे. या दोन आठवड्यात सोन्याच्या किमतीमध्ये चढउतार दिसून आले. (Gold-Silver Rate Today)
गेल्या दोन दिवसांत सोनं आणि चांदी या दोन्ही धातुमध्ये मोठी दरवाढ झाली आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्था व फेडरल रिझर्व्ह बँकेने कमी केलेले व्याजाचे दर यामुळे दोनच दिवसात चांदीच्या भावात प्रतिकीलो जवळपास 7 हजारांची वाढ झाली आहे. तर सोन्याच्या भावातही (Gold Price) प्रति तोळा 2 हजार रुपयांची वाढ झाली.
आजचे सोने-चांदीचे दर
देशातील प्रसिद्ध अशा खामगाव येथील बाजारपेठेत चांदी 91000 रुपये प्रति किलो तर सोने 75200 रू प्रति तोळे मिळत आहे. मात्र ही दरवाढ दिवाळी पर्यंत स्थिरावेल, अशी सराफा बाजारात चर्चा आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.(Gold-Silver Rate Today)
वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर तसेच शुल्क लागू केले जात नाही.मात्र, सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. या आठवड्यात चांदीने देखील मोठी आघाडी घेतली.
10 सप्टेंबर रोजी 1 हजारांनी तर 11 सप्टेंबरला 500 रुपयांनी चांदी वधारली. 13 सप्टेंबर रोजी या धातूने 3,000 रुपयांची उसळी घेतली. तर आज 15 सप्टेंबर रोजी किंमती पुन्हा 2,500 रुपयांनी वधारल्या.आज सकाळच्या सत्रात एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73,044, 23 कॅरेट 72,752, 22 कॅरेट सोने 66,908 रुपयांवर घसरले. तर 18 कॅरेट आता 54,783 रुपये, 14 कॅरेट सोने 42,731 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. (Gold-Silver Rate Today)
News Title – Gold-Silver Rate Today 15 September 2024
महत्त्वाच्या बातम्या-
“विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर होती, पण..”; नितीन गडकरींचा मोठा खुलासा
सर्वसामान्यांना झटका! खाद्य तेलाच्या दरात झाली मोठी वाढ
महादेवाच्या कृपेने आज ‘या’ 5 राशींना लाभच लाभ मिळणार!
अखेर अनन्याकडून आदित्य राॅय कपूरसोबतच्या ब्रेकअपबद्दल खुलासा!
ईद-ए-मिलाद-उन-नबी 2024 कधी साजरा होणार; जाणून घ्या योग्य तारीख






