आनंदवार्ता! दमदार बॅटिंगनंतर सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट दर

On: September 13, 2024 11:55 AM
Gold-Silver Rate Today 13 September 2024
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | देशभरात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. मात्र, या सणा-सुदीच्या काळात मौल्यवान धातूने चांगलीच आघाडी घेतली. या आठवड्यात ग्राहकांना जराही दिलासा मिळाला नाही. आज 13 सप्टेंबररोजी आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत सोनं काही अंशी खाली आलं आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात घरसणीचे संकेत मिळाले. (Gold-Silver Rate Today )

10 सप्टेंबर रोजी सोने 440 रुपयांनी खाली आले होते. 11 सप्टेंबर रोजी सोने 380 रुपयांनी वधारले. तर 12 सप्टेंबर रोजी त्यात किंचित घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात सुद्धा भाव उतरल्याचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

या आठवड्यात चांदी देखील महाग झाली आहे. 10 सप्टेंबरला चांदीमध्ये 1 हजार रुपयांची वाढ झाली. 11 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी किंमत वधारली. तर 12 सप्टेंबर रोजी भाव स्थिर होता. आज सकाळच्या सत्रात चांदीत पुन्हा घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,801, 23 कॅरेट 71514, 22 कॅरेट सोने 65,770 रुपयांवर खाली आहे. तर 18 कॅरेट सोने आता 53,851 रुपये, 14 कॅरेट सोने 42,004 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. (Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.(Gold-Silver Rate Today )

News Title – Gold-Silver Rate Today 13 September 2024

महत्त्वाच्या बातम्या-

हार्दिक पांड्याच्या आयुष्यात नव्या मुलीची एन्ट्री?, नताशा म्हणाली…

आज ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, उर्वरित भागात काय आहे स्थिती?

शेअर बाजारात नवा स्कॅम; ‘या’ व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून होतेय फसवणूक

अजितदादांना मोठा झटका, कट्टर समर्थक शरद पवारांच्या गळाला?

सरकारकडून सर्वसामान्यांना मिळणार मोठं गिफ्ट, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?

Join WhatsApp Group

Join Now