Gold-Silver Rate Today | गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातू सोन्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. सोने आणि चांदी या दोन्ही धातूने या महिन्यात चांगलीच आघाडी घेतली. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 1700 रुपयांची वाढ झाली. (Gold-Silver Rate Today )
स्थानिक ज्वेलर्सची वाढलेली खरेदी आणि जागतिक बाजारातून मिळालेले मजबूत संकेत यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, आता फेडला व्याजदरात 0.25 टक्क्यांहून अधिक कपात करणे सोपे होणार आहे. यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या दिल्लीत सोने 500 रुपयांनी महागले आहे. येथे 24 कॅरेट सोन्याचा दर हा 74,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर, 99.5 टक्के शुद्धतेचे सोनेही 500 रुपयांनी वाढून 74,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 73,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
आजचे सोने-चांदीचे दर
10 सप्टेंबर रोजी सोने 440 रुपयांनी उतरले. त्यानंतर बुधवारी सोने 380 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,310 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.(Gold-Silver Rate Today )
दुसरीकडे, चांदीच्या दरात 1700 रुपयांची वाढ झाली आहे. 10 तारखेला चांदीच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली. 11 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी किंमत वधारली. तर आज 12 सप्टेंबररोजी त्यात पुन्हा 100 रुपयांची दरवाढ नोंदवली गेली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,600 रुपये आहे.
घरबसल्या जाणून घ्या भाव-
दरम्यान ग्राहक घरबसल्या देखील सोने-चांदीचे दर जाणून घेऊ शकतात. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवार आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.(Gold-Silver Rate Today )
News Title – Gold-Silver Rate Today 12 September 2024
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यात ‘या’ भागांवर गडद ढगांची चादर, पुढील दोन दिवस धो-धो बरसणार!
आज गौरी विसर्जनाच्या दिवशी ‘या’ 5 राशींना देवी करणार धनवान!
‘या’ राशींनी आज सावध राहावे, तुमच्या हळव्या स्वभावाचा फायदा घेतला जाऊ शकतो!






