गुंतवणूकदारांना धक्का! सोने-चांदीचे दर वाढले; जाणून घ्या आजचे दर

On: February 4, 2026 1:03 PM
Gold Silver Price
---Advertisement---

Gold Price Today | गेल्या दोन-तीन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर आज सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा जोरदार वाढ झाली आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम सराफा बाजारावर दिसून येत असून गुंतवणूकदारांसह ग्राहकांसाठीही आजचे दर महत्त्वाचे ठरत आहेत. अचानक झालेल्या या वाढीमुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्यांना किंचित धक्का बसल्याचं चित्र आहे.

MCX आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली :

ऑल इंडिया सर्राफा असोसिएशनच्या माहितीनुसार, ९९.९ टक्के शुद्धतेच्या म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा दर आज तब्बल ५,००० रुपयांनी वाढून १० ग्रॅममागे ₹१,५७,७०० वर पोहोचला आहे. ही वाढ सुमारे ३.३ टक्क्यांची आहे. विशेष म्हणजे २९ जानेवारी रोजी सोने ₹१,८३,००० या उच्चांकावर गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात नफा वसुली झाली होती, ज्यामुळे दरात सुमारे १७ टक्क्यांची घसरण झाली होती. (Gold Price Today)

दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट सोन्याचा दर किंचित घसरून १० ग्रॅममागे ₹१,४९,००० इतका नोंदवण्यात आला आहे. सोमवारी MCX वर सोने ₹१,४१,९०० वर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही स्पॉट गोल्डमध्ये जवळपास २ टक्क्यांची वाढ झाली असून दर प्रति औंस ५,००० डॉलर्सच्या पुढे गेला आहे. जागतिक आर्थिक घडामोडी आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोन्याच्या दरांना आधार मिळत असल्याचं चित्र आहे.

Gold Price Today | विविध संस्थांचे आजचे दर :

गुडरिटर्न्सनुसार आज सोन्याचा दर १० ग्रॅममागे ₹१,५४,०९० इतका आहे. तर इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार बुधवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,५१,५२९ प्रति १० ग्रॅम इतका नोंदवण्यात आला आहे.

IBJA नुसार आजचे दर असे आहेत. २४ कॅरेट ₹१,५१,५२९, २३ कॅरेट ₹१,५०,९२२, २२ कॅरेट ₹१,३८,८०१, १८ कॅरेट ₹१,१३,६४७ आणि १४ कॅरेट ₹८८,६४५ प्रति १० ग्रॅम इतके आहेत. या दरांमुळे दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांनाही अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागू शकतो.

प्रमुख शहरांतील सोन्याचे भाव :

दिल्ली, लखनऊ, नोएडा, गुरुग्राम, जयपूर, चंदीगड यांसारख्या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे ₹१,५४,०९० प्रति १० ग्रॅम असून २२ कॅरेटचा दर ₹१,४१,२६० दरम्यान आहे. मुंबई, पुणे, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि केरळमध्ये २४ कॅरेट सोने सुमारे ₹१,५३,९४० दराने व्यवहारात आहे. चेन्नईमध्ये मात्र दर तुलनेने जास्त असून येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,५५,६८० प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला आहे.

मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सलग तीन दिवसांची घसरण थांबवत सोन्याच्या दरांनी जोरदार उसळी घेतली होती. गुंतवणूकदारांकडून वाढलेली खरेदी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबुती यामुळे दर वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने जवळपास ६ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ४,९३५ डॉलर्सच्या आसपास पोहोचले होते. या पार्श्वभूमीवर येत्या काळातही सोन्याच्या दरांमध्ये चढ-उतार कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News Title: Gold-Silver Prices Surge Again in India on February 4, 2026; Check Today’s Rates

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now