Gold Silver Price | मकरसंक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठत सामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक धक्का दिला आहे. बुधवार, १४ जानेवारी रोजी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. सणासुदीच्या काळात दागिन्यांची खरेदी वाढते, मात्र यंदा दर इतक्या वेगाने वाढल्याने खरेदीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर ५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक्सपायरी असलेले सोन्याचे वायदे ₹१,४०,५०१ प्रति १० ग्रॅम दराने उघडले. मागील व्यवहार दिवशी सोन्याचा भाव ₹१,४२,२४१ वर बंद झाला होता. सकाळी १०:१० वाजता सोन्याचा दर ₹१,४३,००७ पर्यंत पोहोचला असून सुरुवातीच्या व्यवहारात ₹१,४३,०९६ चा उच्चांक नोंदवण्यात आला. एका दिवसात सुमारे ₹८०० रुपयांची वाढ झाल्याचे चित्र आहे.
मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर भाववाढीचा मोठा झटका :
सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही मोठी उसळी पाहायला मिळत आहे. ५ मार्च २०२६ रोजी एक्सपायरी असलेली चांदी MCX वर ₹२,८६,४०४ प्रति किलो दराने व्यवहार करत होती. मागील दिवसाच्या तुलनेत चांदीच्या भावात सुमारे ₹११,२०० रुपयांची वाढ झाली असून सुरुवातीच्या सत्रात चांदीने ₹२,८७,९९० चा उच्चांक गाठला. (Today Gold Silver Price)
जळगाव सुवर्णनगरीत जीएसटी विना सोन्याचा भाव ₹१ लाख ४२ हजारांवर पोहोचला असून जीएसटीसह हा दर ₹१ लाख ४६ हजार २६० रुपये इतका झाला आहे. चांदीचे दर जीएसटी विना ₹२ लाख ८२ हजार तर जीएसटीसह ₹२ लाख ९० हजार ४०० रुपये इतके झाले आहेत. २०२६ मधील सोन्या-चांदीच्या दरातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
Gold Silver Price | प्रमुख शहरांतील सोन्याचे दर काय सांगतात? :
देशातील प्रमुख शहरांमध्येही सोन्याचे दर उच्च पातळीवर पोहोचले आहेत. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,४३,७७० तर २२ कॅरेटचा दर ₹१,३१,८०० असून १८ कॅरेट सोन्यासाठी ₹१,०७,८७० मोजावे लागत आहेत. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,४३,६२०, २२ कॅरेट ₹१,३१,६५० आणि १८ कॅरेट ₹१,०७,७२० इतका आहे. (Silver Price Today)
चेन्नईमध्ये सोन्याचे दर तुलनेने अधिक असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,४४,८८०, २२ कॅरेट ₹१,३२,८०० आणि १८ कॅरेट ₹१,१०,८०० इतका आहे. कोलकाता, हैदराबाद आणि पटनामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे ₹१,४३,६२० ते ₹१,४३,६७० दरम्यान आहे, तर अहमदाबाद आणि लखनऊमध्येही दर याच पातळीवर स्थिरावलेले दिसत आहेत. (Today Gold Silver Price)
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलर-रुपया विनिमय दर, गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वाढलेला ओढा आणि औद्योगिक क्षेत्रात चांदीचा वाढता वापर ही दरवाढीची प्रमुख कारणे मानली जात आहेत. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांनी स्थानिक दर तपासूनच निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.






