Gold Rate | सोने बाजारात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात थोडी घसरण जाणवली असली तरी सोन्याचे दर जागतिक बाजारात पुन्हा जोर धरू लागले आहेत. सध्या सोने 4,000 डॉलर प्रति औंसपेक्षा जास्त पातळीवर ट्रेड होत असून गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून Gold ETF मध्ये सलग वाढ नोंदवली गेल्याने विश्वास अधिक बळकट होत आहे. (Gold New Record)
MCX वर देखील सोन्याने विक्रमी वाढ दाखवली. पिवळ्या धातूने जानेवारीपासून आत्तापर्यंत प्रत्येक महिन्यात मोठी झेप घेतली असून 1979 नंतरचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देत असल्याचे बाजारतज्ज्ञ सांगतात. सोमवारी 5 फेब्रुवारी डिलिव्हरीच्या सौद्यात सोन्यात 700 रुपयांनी उडी घेतली. मागील सत्रात 1,27,667 रुपये प्रति 10 ग्रॅमने बंद झालेल्या सोन्याचे भाव आज 1,28,352 रुपयांवर उघडले. येत्या दिवसांत लग्नसराईच्या मागणीमुळे सोने नवीन ऑल-टाइम हाय करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अमेरिकेतील घडामोडींनी सोन्याला पाठबळ :
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह डिसेंबरमध्ये व्याजदर कमी करण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने सोन्याला आणखी गती मिळणार आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार अमेरिकेतील शटडाऊनमुळे आर्थिक संकेतांक अनिश्चित आहेत. परिणामी गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे म्हणजे सोन्याकडे वळताना दिसत आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर 4,170 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचले असून फक्त एका आठवड्यात 2% पेक्षा अधिक वाढ नोंदली आहे. (MCX Gold Price)
व्याजदर कमी झाल्यास सोन्याची मागणी आणखी वाढते, कारण बॉण्ड यिल्ड कमी झाल्यावर सुरक्षित आणि कमी जोखीम असलेली गुंतवणूक म्हणून सोने आकर्षक ठरते. त्यामुळे पुढील काही दिवस सोन्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. जागतिक व देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून वाढलेल्या खरेदीमुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
Gold Rate | लग्नसराईचा सीझन, चांदीदेखील चमकणार :
भारतात लग्नसराईचा मोसम सुरू होताच सोने आणि चांदीच्या किंमतीत प्रचंड तेजी दिसू लागते. जळगावच्या सराफा बाजारात गेल्या तीन दिवसांत 1300 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याच कालावधीत चांदीच्या दरात तब्बल 6,500 रुपयांनी वाढ झाली आहे. दोन्ही धातूंमध्ये अजूनही वाढीची शक्यता व्यक्त होत आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या बजेटवर मोठा भार पडणार आहे.
जगभरातील मध्यवर्ती आणि केंद्रीय बँकांनीही सोन्याची विक्रमी खरेदी केली आहे. तिसऱ्या तिमाहीत 220 टन सोने खरेदी करत गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 10% वाढ नोंदवण्यात आली. बँकांच्या या आक्रमक खरेदीमुळे सोन्याच्या किंमतींना अधिक आधार मिळत आहे. (Gold New Record)
29 नोव्हेंबर 2025 रोजी चांदीमध्येही मोठी उसळी दिसली. एक किलो चांदीचा भाव 1,76,100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. जागतिक बाजारात सलग पाचव्या दिवशी चांदीने वाढ नोंदवली असून दर 53.81 डॉलर प्रति औंसवर पोहोचला. गुंतवणूक तज्ज्ञ रॉबर्ट कियोसाकी यांच्या अंदाजानुसार चांदी लवकरच 70 डॉलर प्रति औंस आणि 2026 मध्ये 200 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे चांदी सोन्यासह गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते.






