Today Gold Price | राज्यातील सराफा बाजारातून सामान्य ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली सोन्या-चांदीच्या दरातील वाढ आता विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांत सोन्याच्या दरात तब्बल 11 हजार 500 रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या दरातही 50 हजार रुपयांची झपाट्याने वाढ नोंदवण्यात आली आहे. (Today Gold Price)
गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे. याच कारणामुळे बाजारात खरेदीचा कल वाढला असून त्याचा थेट परिणाम सराफा बाजारातील दरांवर दिसून येत आहे. परिणामी, सामान्य ग्राहकांचे बजेट अक्षरशः कोलमडले आहे.
जळगाव सराफा बाजारात विक्रमी दर :
जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका दिवसात सोन्याच्या दरात 2 हजार 700 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही 5 हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ( Maharashtra Gold News)
या भाववाढीनंतर जीएसटीसह सोन्याचा दर 1 लाख 40 हजार 80 रुपये प्रति 10 ग्रॅम इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 16 हजार 300 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. हे दर आतापर्यंतचे विक्रमी दर मानले जात आहेत.
Today Gold Price | ग्राहकांवर थेट परिणाम, दागिन्यांची खरेदी घटली :
सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या या प्रचंड वाढीचा थेट परिणाम ग्राहकांवर झाला आहे. वाढत्या किमतींमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, दागिने खरेदी करण्याचा निर्णय पुढे ढकलला जात आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या काळातही ग्राहक सावध पवित्रा घेत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, सोन्या-चांदीचे दर आवाक्याबाहेर गेल्याने अनेक महिला आता पर्यायी दागिन्यांकडे वळताना दिसत आहेत. महागड्या सोन्या-चांदीऐवजी बेंटेक्स आणि कृत्रिम दागिन्यांची मागणी वाढताना पाहायला मिळत आहे, अशी माहिती सराफा व्यावसायिकांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या सोन्याचा भाव अशाच वेगाने वाढत राहणार की काही काळात स्थिर होणार, याबाबत बाजारात तर्कवितर्क सुरू आहेत. जागतिक पातळीवरील आर्थिक परिस्थिती आणि गुंतवणुकीचा वाढता कल पाहता, येत्या काळातही दरात चढउतार सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






