सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

On: February 8, 2026 7:42 PM
Gold Silver Price
---Advertisement---

Gold Price | गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता पाहायला मिळत होती. मात्र आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगाव सराफ बाजारात अवघ्या आठ दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 4,300 रुपयांची घसरण झाली असून चांदीचे दरही मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दागिन्यांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. (Today Gold Price)

महागाईच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडल्याने अनेकांनी खरेदी पुढे ढकलली होती. मात्र आता दर घसरल्याने विवाह, सण-समारंभ तसेच गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करण्यासाठी ही योग्य संधी मानली जात आहे. सराफ बाजारातही यामुळे ग्राहकांची वर्दळ वाढल्याचं चित्र आहे.

10 ग्रॅम सोनं किती स्वस्त झालं? :

31 जानेवारी रोजी विना जीएसटी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 58 हजार 800 रुपये होता. मात्र आता तो थेट 1 लाख 54 हजार 500 रुपयांपर्यंत खाली आला आहे. म्हणजेच अवघ्या आठ दिवसांत सोनं 4,300 रुपयांनी स्वस्त झालं आहे. याच कालावधीत चांदीचा दरही मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, 3 लाख 3 हजार रुपयांवर असलेली चांदी आता 2 लाख 60 हजार रुपयांपर्यंत घसरली आहे.

दर घसरल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून अनेकांनी पुन्हा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू केली आहे. लग्नसराई आणि आगामी सण लक्षात घेता बाजारात व्यवहार वाढण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

Gold Price | पुढील काळात दर वाढणार की कमीच राहणार? :

सध्या सोनं आणि चांदीचे दर कमी झाले असले तरी आगामी काळात पुन्हा वाढ होण्याची शक्यता सराफ बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. जागतिक बाजारातील हालचाली, डॉलरचे मूल्य आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींवर पुढील दर अवलंबून असतील, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ग्राहक “आताच खरेदी करावी की अजून वाट पाहावी?” या संभ्रमात आहेत. (Today Gold Price)

दरम्यान, सध्याच्या घसरणीचा फायदा घेत अनेकांनी गुंतवणूक आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे. त्यामुळे अल्पकालीन दृष्टीने तरी सोन्याचा बाजार पुन्हा तेजीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

News Title: Gold Price Crashes by ₹4,300, Is This the Right Time to Buy Jewellery?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now