निवडणुकीआधी गिरीश महाजन संकटात; महिला पोलीस अधिकाऱ्याचे अत्यंत गंभीर आरोप

On: October 19, 2024 1:21 PM
Girish Mahajan
---Advertisement---

Girish Mahajan | विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणूक तोंडावर असताना भाजपचे संकटमोचक समजले जाणारे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) अडचणीत सापडले आहेत.

महिला पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी महाजन (Girish Mahajan) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यासोबत नवटके यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक डॉ. रश्मी शुक्ला यांचंही नाव घेतलं आहे. या प्रकरणामुळे महाजन संकटात सापडल्याचं बोललं जात आहे.

नेमकं प्रकरणं काय?

जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्याच्या चौकशीमध्ये त्रुटी ठेवल्याप्रकरणी नवटके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नवटके यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये, महाजने हे लाभार्थी असल्याचं उघड झाल्याचा दावा केला आहे, तर रश्मी शुक्ला यांच्याशी संबंधित व्यक्तीवर कारवाई केल्याने आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचं नवटकेंनी याचिकेमध्ये म्हटलं आहे.

गिरीश महाजन यांनी आरोप फेटाळले

या प्रकरणावर प्रतिक्रिया देत गिरीश महाजन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मला अडकवण्यासाठी करण्यात आलेलं षडयंत्र आहे, असं गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटलं आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव न घेता तपास करणं अपेक्षित असतं. मी आणि माझ्या पत्नीने एक रूपयाचेही कर्ज घेतले नसून तपास सीबीआय आणि न्यायालयातही हे प्रकरण असल्याने सत्य लवकरच बाहेर येईल, असं म्हणत गिरीश महाजनांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

ठाकरे गटाची संभाव्य उमेदवार यादी जाहीर! पाहा यादी एका क्लिकवर

ठाकरे गटाची संभाव्य उमेदवार यादी समोर; पाहा कुणा-कुणाला मिळाली संधी?

शिंदे सेनेतील ‘या’ दोन बड्या नेत्यांविरोधात उद्धव ठाकरेंची मोठी खेळी!

अजित पवार गटातून कोण कुठं लढणार? संभाव्य उमदेवार यादी समोर

शरद पवार गटाची संभाव्य उमदेवार यादी समोर! पाहा संपूर्ण यादी

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now