Gautami Patil l आयपीएल 2025 हंगामाला धमाकेदार सुरुवात झाली असून, क्रिकेटप्रेमींसह सेलिब्रिटी मंडळींमध्येही आवडत्या संघासोबतची नाळ अधिक घट्ट होताना दिसते. याच पार्श्वभूमीवर लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिने कोणत्या संघाला सपोर्ट करते, हे जाहीर करत चाहत्यांच्या उत्सुकतेला पूर्णविराम दिला आहे.
पंढरपुरात हिंदवी महिला प्रतिष्ठान आणि ग्रँड रेसिडेन्सी यांच्या वतीने आयोजित महिलांसाठीच्या खास कार्यक्रमात गौतमी पाटील सहभागी झाली होती. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर तिने कोणत्या IPL संघाला समर्थन देणार, हे उघड केलं.
“मी मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणार” – गौतमी पाटील :
गौतमी पाटीलने स्पष्टपणे म्हटलं, “मी महाराष्ट्रीय आहे, महाराष्ट्रातच राहते. त्यामुळे मी मुंबई इंडियन्सलाच सपोर्ट करणार आहे. तुम्ही सगळेही मुंबई इंडियन्सला पाठिंबा द्या,” असं आवाहन तिने चाहत्यांना केलं.
तिच्या या विधानावर उपस्थित महिलांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिला. गौतमीने मराठी अस्मितेचा आधार घेत मुंबई इंडियन्सच्या समर्थनाची भूमिका घेतल्याने तिच्या चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.
Gautami Patil l सामन्यात काय घडलं? :
रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. मुंबईने दिलेलं 156 धावांचं लक्ष्य चेन्नईने 20 व्या षटकात 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या सामन्यात चेन्नईकडून रचिन रविंद्रने सर्वाधिक 65 धावा करत महत्त्वाची भूमिका बजावली.
चेन्नईची फलंदाजी सुरुवातीला डळमळीत होती, त्यामुळे महेंद्रसिंग धोनीलाही 8व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरावं लागलं. मुंबईकडून तिलक वर्मा (31) आणि सूर्यकुमार यादव (29) यांनाच काहीसा झुंज देता आली.
मुंबईचा पराभव… पण चाहत्यांचा पाठींबा कायम :
मुंबई इंडियन्सने पहिल्याच सामन्यात पराभव पत्करल्याची परंपरा यंदाही कायम राहिली. पण चाहत्यांच्या उत्साहात मात्र घट झालेली नाही. गौतमी पाटीलसारख्या मराठी सेलिब्रिटींनी केलेल्या समर्थनामुळे मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास कायम राहील, असं चाहते मानत आहेत.






