Gautmi Patil Accident Case | पुण्यातील नवले उड्डाणपूलाजवळील अपघात प्रकरणात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिला शेवटी मोठा दिलासा मिळाला आहे. रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे पॅसेंजरसाठी रस्त्याच्या कडे उभा होते. तेव्हा अचानक मागून कार ने त्यांना जोरात धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. हा अपघात 30 सप्टेंबर रोजी पहाटे घडला होता. (Gautmi Patil Accident Case)
तपासात काय आले समोर :
सुरुवातीला रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटीलवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणामुळे परिस्थित गंभीर झाली होती. कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही याप्रकरणात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलिसांना दिल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण प्रचंड तापले होते. या अपघात प्रकरणात गौतमी पाटील हिला शुक्रवारी नोटीस धाडली होती.
पोलिस तपासात समोर आले की, अपघाताच्या वेळी गौतमी पाटील (Gautami Patil) कारमध्ये नव्हती. परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले, ज्यात स्पष्ट झाले की अपघाताच्या वेळी कारमध्ये फक्त चालक होता. त्यामुळे पोलिसांनी गौतमी पाटील हिला क्लीन चिट देऊन तिची जबाबदारी नाही असे ठरवले.
गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला धडक दिली होती, परंतु अपघाताच्या वेळी ती कारमध्ये नसल्यामुळे आता तिला कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. पोलिसांनी या घटनेची सविस्तर चौकशी केली असून, अपघातातील चालकाची भूमिका स्वतंत्रपणे तपासली आहे.
Gautmi Patil Accident Case | गाडीचा ड्राइवर बदलला: रक्षाचालकाच्या कुटुंबीयांचा आरोप
“30 सप्टेंबरला आमचा भाऊ पहाटे पाच वाजता 10 रुपये मिळवण्यासाठी पॅसेंजरची वाट पाहत उभा होता. त्याची रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यावेळी मागून एक कार आली आणि त्याला ठोकून निघून गेली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षा तीनवेळा पलटी आणि आमचा भाऊ जखमी होऊन रस्त्यावर पडला. या अपघातानंतर ज्या कारने धडक दिली, त्यामधील लोक खाली उतरले आणि निघून गेले. (Gautmi Patil Accident Case)
मात्र, अर्धा तासाने एक व्यक्ती पुन्हा आला आणि त्याने त्याच्यासोबत टोईंग व्हॅन आणली होती. टोईंग व्हॅनच्या क्रेनने गौतमी पाटीलची कार टो करुन घटनास्थळावरुन नेण्यात आली. मात्र, आमचा भाऊ जखमी अवस्थेत तसाच रस्त्यावर पडून होता. त्याच्याकडे कोणीही बघितले नाही. रिक्षावाल्यांनी वेळीच मदत केली म्हणून आमच्या भावाचा जीव वाचला. वैद्यकीय तपासणीसाठी दुसऱ्याच कोणालातरी आयत्यावेळी ड्रायव्हर म्हणून सादर करण्यात आले. पोलीस हायवेवरील कॅमेरे बंद असल्याचे सांगत आहेत. पुण्यासारख्या शहरात असे कसे होऊ शकते ? “, असे अनेक सवाल रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी उपस्थित केले होते.






