गौतम अदाणींनी सिल्वर ओक बंगल्यावर घेतली शरद पवारांची भेट!

On: April 20, 2023 1:41 PM
---Advertisement---

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेस उद्योगपती गौतम अदानी (Gauram Adani) यांना टार्गेट करतं. अशातच उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

या दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. या चर्चेवेळी राष्ट्रवादीचा (Ncp) एकही नेता उपस्थित नव्हता. या दोघांमध्ये चर्चा काय झाली हे गुलदस्त्यात आहे

शरद पवार (Sharad Pawar) आणि गौतम अदाणी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अदाणी किंवा शरद पवार यांच्याकडून काहीही तपशील समोर आलेला नाही.

दरम्यान, गौतम अदाणी यांनी 20 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असा हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर खळबळ माजली होती. हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी हिंडेनबर्ग हे नाव आपण ऐकलं नाही असं म्हटलं होतं. अशात अदाणींनी पवारांची भेट घेतल्यानं खळबळ माजली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now