Gauri Pujan 2024 | देशभरात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. गणेशोत्सवाच्या काळातच महालक्ष्मीचे आगमन होते.घरोघरी मोठ्या उत्साहाने ज्येष्ठा गौरीचे स्वागत करण्यात आले. ज्येष्ठा गौरी आवाहन हा महाराष्ट्रातील अनेक उत्सवांपैकीच एक महत्त्वाचा सण आहे. गौरी पूजन हा सण ज्येष्ठ गौरी पूजन या नावानेही ओळखला जातो. काल 10 सप्टेंबरपासून या सणाला सुरुवात झाली. (Gauri Pujan 2024)
आज 11 सप्टेंबर बुधवारी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीपूजन असणार आहे. त्यानंतर 12 सप्टेंबरला रात्री 9 वाजून 51 मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन करावं. यंदा 10 तारखेला गौरीचं आगमन झालं. सकाळी 6:04 ते संध्याकाळी 6:32 पर्यंत याचे आवाहन मुहूर्त होता.
ज्येष्ठा गौरी पूजन मुहूर्त
आज 11 सप्टेंबररोजी भाद्रपद शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला गौरी पूजन, नैवेद्य आणि हळदीकुंकू असणार आहे. आज अष्टमी तिथी 11 वाजून 45 मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तर ज्येष्ठा नक्षत्र रात्री 9 वाजून 20 मिनिटांपर्यंत जागृत असेल. (Gauri Pujan 2024)
ज्येष्ठा गौरी पूजन पद्धत-
माता गौरीला पाण्याने आंघोळ घालून स्वच्छ स्टूलवर कापड पसरावं, त्यावर गौरी विराजमान कराव्यात. त्यानंतर गौरीला साडी नेसवून सोळा अलंकार करावेत. त्यानंतर गौरीच्या कपाळावर हळद, कुंकू आणि अक्षत लावतात. ज्येष्ठा गौरीच्या दिवशी गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना एका शुभ मुहूर्तावर केली जाते. नैवेद्याच्या दुसऱ्या दिवशी 16 भाज्या, 16 कोशिंबीर, 16 चटण्या, 16 पदार्थ गौरीला अर्पण केले जातात. यानंतर 16 दिव्यांनी गौरीची आरती करण्याची मान्यता आहे. (Gauri Pujan 2024)
ज्येष्ठा गौरी विसर्जन कधी असणार?
भाद्रपद शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला म्हणजे, गुरुवारी 12 सप्टेंबरला गौरी – गणपतीचं विसर्जन आहे. यादिवशी सात दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. (Gauri Pujan 2024)
News Title – Gauri Pujan 2024
महत्त्वाच्या बातम्या-
लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 4 राशींचं नशीब चमकणार, मिळणार अमाप पैसा!
मुलीच्या लग्नासाठी सरकार देणार पैसे, ‘कन्यादान योजना’ आहे तरी काय?
जगभरात BCCIची नाचक्की! वॉशरूमच्या पाण्यापासून बनवलं जेवण?
महायुतीला झटका देणारं सर्वेक्षण समोर!
देशाचा गृहमंत्री असताना काश्मीरला जाताना माझी XXX’, सुशीलकुमार शिंदे यांचं धक्कादायक वक्तव्य






