दिवाळीपूर्वीच महागाईचा भडका! गॅस सिलिंडर महागले, काय आहेत नवे दर?

On: October 1, 2024 8:26 AM
LPG Gas
---Advertisement---

Gas Cylinder Price | आज 1 ऑक्टोबररोजी महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचा दरातही बदल होतो. मार्च महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल झालेला नाही. मात्र व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सतत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या महिन्यात देखील व्यावसायिक सिलिंडर महागले आहे. (Gas Cylinder Price)

ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये 94 रुपयांची वाढ झालेली आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर 1900 रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नई आणि कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत 48 रुपयांची वाढ करण्यात आलीये.

1900 रुपयांवर पोहोचला व्यावसायिक सिलिंडर

चेन्नईमध्ये आता व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1903 रुपये तर कोलकाता शहरात सिलिंडरची किंमत 1850.50 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईतही गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 48.5 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या मुंबईत गॅस सिलिंडर 1692.50 रुपयांवर पोहोचले आहे. (Gas Cylinder Price)

गेल्या तीन महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सतत वाढ दिसून आली आहे. दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सरासरी 94 रुपयांची वाढ झालेली आहे. तसेच कोलकाता आणि मुंबईमध्ये 94.5 रुपयांची वाढ झाली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचा दर काय?

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मार्च महिन्यापासून कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरचा दर 802.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा दर 818.50 रुपयांवर गेला आहे.(Gas Cylinder Price)

मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात करण्यात आली होती. मार्चनंतर घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आता लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे. तसेच पुढच्या महिन्यात दिवाळी हा मोठा सण आहे. त्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News Title – Gas Cylinder Price increased on 1st October

महत्वाच्या बातम्या-

बाप्पाच्या आशीर्वादाने महिन्याची सुरुवात, पाहा तुमच्या राशीभविष्यात आज काय लिहिलंय?

धक्कादायक! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीच्या गाडीचा भीषण अपघात

दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या किंमत

सरकार म्हणजे विषकन्या; भाजपच्या बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

धक्कादायक! पुणे जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, 42 जखमी तीन गंभीर

 

Join WhatsApp Group

Join Now