गणेशोत्सवात ‘या’ नवसाला पावणाऱ्या बाप्पांचे घ्या दर्शन, सर्व संकटे होतील दूर

On: August 31, 2024 8:32 AM
Ganeshotsav 2024 Lord Ganesha mandir in india
---Advertisement---

Ganeshotsav 2024 | गणेशोत्सव आता तोंडावर आला आहे. मुंबई आणि पुण्यात अनेकांच्या घरात दीड दिवसांचा गणपती बसवला जातो. या काळात घरातील वातावरण उल्हासाचे आणि आनंदाचे असते. यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. या दरम्यान देशातील काही जागृत गणपती मंदिरे आहेत. येथे जाऊन आपण गणपती दर्शन घेऊ शकता. या लेखात नवसाला पावणाऱ्या बाप्पाबद्दल माहिती देण्यात आली आहे. (Ganeshotsav 2024)

देशातील नवसाला पावणारे बाप्पा-

सिद्धिविनायक मंदिर : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर देशातील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. हे मंदिर 1801 मध्ये उभारण्यात आले होते.मुंबईत तुम्ही दादर-प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरातील जागृत गणेशाचे दर्शन घेऊन आशीवार्द घेऊ शकता.

त्रिनेत्र गणेश : देशातील आणखी एक प्रसिद्ध गणेश मंदिर म्हणजे राजस्थान त्रिनेत्र गणेश. हे श्री गणेशाचे मंदिर राजस्थानातील सर्वात चर्चित टूरिस्ट डेस्टीनेशन रणथंबोर नॅशनल पार्कच्या जवळ स्थित आहे.या मंदिराचे खास वैशिष्ट्ये म्हणजे येथे दर्शनाला येण्यापूर्वी भाविक गणेशाला चिठ्ठी पाठवितात. या चिठ्ठ्यांना स्वत:पोस्टमन पोहचवितात. नवस पूर्ण झाल्यानंतर येथे येऊन लोक नवस फेडतात. हे प्रसिद्ध मंदिर जयपूरहून काही किलोमीटर अंतरावर आहे.(Ganeshotsav 2024)

खजराना गणेश मंदिर : मध्य प्रदेशातील इंदौर येथील खजराना गणेश मंदिर देशातील एका श्रीमंत देवस्थानापैकी एक मानले जाते. या गणेशाला नवसाला पावणारा मानला जाते.येथील गणेशाची प्रतिमा तीन फूट उंचीची आहे. भाविक येथे मोठ्या संख्येने भेट देतात.

चिंतामण गणपती : उज्जैन येथील प्राचीन मंदिरापैकी एक चिंतामण गणपती मंदिर आहे. चिंतामन गणेश मंदिरात भगवान श्री गणेशाचे चिंतामण गणेश, इच्छामन गणेश आणि सिद्धिविनायक अशी तीन रुपे एक साथ विराजमान आहेत. भाविक जेव्हा त्यांचे नवस पूर्ण होते तेव्हा ते पुन्हा येऊन गणेशाचे दर्शन घेतात. तसेच, मंदिराच्या पाठी सरळ स्वास्तिक चिन्ह तयार करतात.(Ganeshotsav 2024)

गणपतीपुळे मंदिर : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशाचे हे मंदिर प्रसिद्ध असून ते नवसाला पावते.येथील गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.येथील गणेश मूर्ती सुमारे 400 वर्षे जुनी आहे. भाविक मोठ्या संख्येने येथे दरवर्षी भेट देतात.

गढ़ गणेश मंदिर : राजस्थानच्या जयपुरच्या डोंगरावरील या मंदिरातील भगवान गणेशाची मूर्ती सोंड असणारी नाही. या मंदिराची स्थापना राजस्थानचे एक राजा सवाई जयसिंह द्वितीय यांनी केली होती. दिल्लीच्या सराय रोहिल्ला स्टेशन, नवी दिल्ली किंवा जुनी दिल्लीहून जयपुरची ट्रेन सहज मिळते. जयपुरहुन सवाई माधोपुर येथे तुम्ही दर्शन घेऊ शकता.(Ganeshotsav 2024)

News Title :  Ganeshotsav 2024 Lord Ganesha mandir in india
 

महत्वाच्या बातम्या-

महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा!

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकी संदर्भात मोठा निर्णय!

‘या’ लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार? जाणून घ्या लाभ कसा मिळतोय?

गणपती बाप्पा संदर्भात महत्वाची बातमी; थेट होणार पोलिसांची कारवाई

देशात ‘हा’ आजार घालतोय धुमाकूळ; WHO ने दिला इशारा

Join WhatsApp Group

Join Now