अजितदादांची तुफानी खेळी, ४ बडे नेते राष्ट्रवादीत जाणार?

On: April 17, 2025 12:35 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी हालचाल घडली असून तब्बल चार माजी आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व माजी आमदार लवकरच मुंबईत एका विशेष कार्यक्रमात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या घडामोडीमुळे सांगलीतील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता असून जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका निवडणुकीत याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. यासोबतच भाजपमधील काही प्रमुख नेत्यांनीही अजितदादांकडे पाठ फिरवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची तयारी दर्शवली आहे.

कोण आहेत हे चार माजी आमदार? :

या चार माजी आमदारांमध्ये शिराळ्याचे शिवाजीराव नाईक (shivajirao Naik), कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे (Ajitrao Ghorpade), आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख (Rajendra anna deshmukh)  आणि जतचे विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांचा समावेश आहे. या सर्वांनी गेल्या काही वर्षांमध्ये विविध पक्षांतून निवडणूक लढवली असून अनेकदा बंडखोरीची भूमिका देखील घेतली होती.

या नेत्यांसोबतच आटपाडीतील भाजपचे माजी युवा मोर्चा अध्यक्ष अनिल पाटील आणि जतमधील अपक्ष आमदार तमनगौडा रवी पाटील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.

Maharashtra l अजितदादांची ताकद वाढणार :

या पक्षप्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातील अजित पवार (ajit pawar) यांच्या गटाची ताकद अधिक मजबूत होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील सत्तास्थानांवर याचा मोठा प्रभाव पडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

इस्लामपूर मतदारसंघाचे माजी उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्याकडे पक्षवाढीची जबाबदारी देण्यात आली असून ते जिल्ह्यातील नाराज नेते, कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून पक्षात आणण्याचं काम करत आहेत.

मानसिंगराव नाईक कोणत्या गटात? :

दरम्यान, शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao naik) यांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. ते सध्या शरद पवार गटात असले तरी अजित पवार यांच्याशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे ते कोणत्या गटात राहणार हे स्पष्ट व्हायचं बाकी आहे.

अजित पवार (Ajit pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत. भाजपमधून नाराज झालेल्या नेत्यांसाठी हा गट आता आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.

News Title: Four Former Sangli MLAs to Join Ajit Pawar’s NCP in Mumbai, Political Shift Ahead of Local Elections0

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now