इम्तियाज जलीलांच्या कारवर भीषण हल्ला; गाडीतून खेचून मारण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

On: January 7, 2026 4:56 PM
Imtiaz Jalil
---Advertisement---

Imtiaz Jalil Attack | छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगर महापालिकेकडे राज्याचं लक्ष लागलं असून भाजप, शिवसेना, मनसेसह एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जोरदारपणे मैदानात उतरले आहेत. अशातच आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jalil Attack) यांच्या कारवर प्रचारादरम्यान हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धावत्या गाडीच्या मागे धावत जाऊन जलील यांना बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रचार रॅलीदरम्यान गोंधळ, कार्यकर्ता जखमी :

ही घटना संभाजीनगरमधील (Chatrpati Sambhajinagar) बायजीपुरा जिन्सी परिसरात प्रचार रॅलीदरम्यान घडली. सुरुवातीला काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. इम्तियाज जलील यांच्या वाहनात मागील सीटवर बसलेल्या एका व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाली असून एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी झाला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे हा हल्ला एमआयएम पक्षातीलच नाराज गटाकडून झाल्याचा आरोप केला जात आहे. उमेदवारी वाटपावरून पक्षात आधीपासूनच असंतोष असल्याची चर्चा होती आणि त्याचेच पडसाद आजच्या घटनेत उमटल्याचं सांगितलं जात आहे.

Imtiaz Jalil Attack | काँग्रेस उमेदवारावर आरोप, पोलीस चौकशी सुरू :

या प्रकरणी इम्तियाज जलील (Imtiaz Jalil Attack) यांनी काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कलीम कुरेशी यांनीच हा सगळा प्रकार घडवून आणल्याचा दावा जलील यांनी केला आहे. एमआयएमने यंदा संभाजीनगरमध्ये 22 विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्या उमेदवारांना संधी दिली होती, त्यावेळीही पक्षात नाराजी पसरल्याचं पाहायला मिळालं होतं. (Sambhajinagar Municipal Election)

दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून अन्य कार्यकर्त्यांची चौकशी केली जात आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे संभाजीनगरमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News Title: Former MP Imtiaz Jalil’s Car Attacked During Campaign in Sambhajinagar

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now