राजकारणात खळबळ! भाजपच्या माजी आमदाराच्या भावाला अटक

On: December 16, 2025 2:19 PM
Balraje Pawar Arrest
---Advertisement---

Balraje Pawar Arrest | बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार (Balraje Pawar Arrest) यांना गेवराई पोलिसांनी मध्यरात्री अटक केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या अटकेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात आणि पोलीस ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नगरपरिषद निवडणुकीदरम्यान घडलेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. गेवराई शहरात राजकीय वर्चस्वासाठी दोन गटांमध्ये असलेला तणाव दिवसेंदिवस तीव्र होत असून, या अटकेमुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

नगरपरिषद मतदानावेळी हाणामारी, गंभीर आरोप :

2 डिसेंबर रोजी गेवराई नगरपरिषदेच्या (Gevrai Nagarparishad) मतदान प्रक्रियेदरम्यान माजी आमदार लक्ष्मण पवार आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला होता. मतदान केंद्राबाहेर सुरू झालेली बाचाबाची काही वेळातच हाणामारीत रूपांतरित झाली. या गोंधळात अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याचे समोर आले होते.

या घटनेत बाळराजे पवार (Balraje Pawar) यांनी अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. मात्र, अटकेपूर्वी बाळराजे पवार हे स्वतःहून रात्री गेवराई पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तरीही तपासात गंभीर बाबी समोर आल्याने पोलिसांनी अटक करण्याचा निर्णय घेतला.

Balraje Pawar Arrest | गुन्ह्यात वाढ, पोलीस सतर्क :

या प्रकरणाची गंभीर दखल घेत गेवराई पोलिसांनी सुरुवातीला सुमोटो कारवाई करत सुमारे 50 जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते. अनेक संशयितांना नोटीस बजावून चौकशीही करण्यात आली होती. मात्र तपास पुढे जात असताना बाळराजे पवार यांच्यावरील आरोपांची व्याप्ती वाढल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.

गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ झाल्यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत थेट अटक केली. अटकेनंतर गेवराई शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क आहे. पवार आणि पंडित या दोन्ही गटांमध्ये जुने राजकीय वैर असल्याने येत्या काळात परिस्थिती आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

News Title: Former BJP MLA’s Brother Arrested at Midnight in Beed, Heavy Police Bandobast After Action

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now