“मध्यरात्रीच्या अंधारात ‘ते’ आले आणि…”; भाजप कार्यालयावर केला गोळीबार

On: December 17, 2025 12:24 PM
Ambernath firing
---Advertisement---

Ambernath firing | अंबरनाथ शहरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर (Pawan Walekar) यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अंबरनाथ (Ambernath firing) पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात असलेल्या या कार्यालयावर मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी अचानक कार्यालयासमोर थांबून थेट गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे थरारक दृश्य कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. (BJP candidate office firing)

नेमकं काय घडलं? :

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी कार्यालयाच्या दिशेने ३ ते ४ राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आला असता, त्याच्या दिशेनेही गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, या गोळीबारात पवन वाळेकर यांचा सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. भरवस्तीत मध्यरात्री झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Ambernath firing | राजकीय वातावरण तापलं, पोलिसांवर आरोप :

घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. (BJP candidate Pawan Walekar office firing)

दरम्यान, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गोळीबार करणाऱ्यांची नावे सांगूनही त्यांच्यावर योग्य कलमांखाली गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नरेंद्र पवार, गुलाबराव करंजुळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले असून, आज संध्याकाळी अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असल्याने या घटनेला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

News Title: Firing at BJP Candidate Office in Ambernath, Midnight Attack Caught on CCTV

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now