मोठी बातमी! आमदार योगेश कदमांच्या गाडीचा भीषण अपघात

On: January 7, 2023 11:09 AM
---Advertisement---

रत्नागिरी | आमदार योगेश रामदास कदमांच्या (Ramdas Kadam) कारला झालेला भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास कशेडी घाटात हा अपघात झाल्याची माहिती आहे.

निकटवर्तीय आणि कार्यकर्त्यांकडून या अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे. पाठून येणाऱ्या टँकरने आमदार कदमांच्या कारला जोरदार धडक दिली आणि हा टँकर पलटी झाला.

टँकर चालक फरार झाल्याने अनेकांना हा अपघात नव्हे तर घातपात असल्याची शंका आहे. सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

या अपघातानंतर आमदार योगेश कदम यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. मी सुखरूप आहे, काळजी करू नका, असं आवाहन कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.

आई जगदंबेच्या कृपेने आम्ही सर्व सुखरूप असल्याचा संदेश त्यांनी व्हिडीओ शेअर करून दिला आहे. तसंच माझे पुढील कार्यक्रम ठरल्यानुसार होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now