मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटलांनी घेतला मोठा निर्णय!

On: June 8, 2024 10:31 AM
Manoj Jarange
---Advertisement---

Manoj Jarange l राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. या मुद्द्यावरून आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची चांगलाच रान उठवलं आहे. अशातच आता मनोज जरांगे हे मराठा समाजाला सगेसोयरे व्याख्येत बसणारे आरक्षण लागू व्हावे या मागणीसाठी आजपासून पुन्हा एकदा एल्गार करणार आहेत. त्यामुळे हा मुद्दाम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पोलिसांनी मनोज जरांगेच्या आमरण उपोषणाची परवानगी नाकारली :

गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू होती. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण करणे थांबवले होते. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता ही आचारसंहिता संपुष्टात आली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी 4 जूनपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते.

मात्र त्यानंतर जराजे यांनी 4 जूनच्या आंदोलन पुढे ढकलले आणि त्यानंतर ही तारीख बदलून 8 जून केली. मात्र आता पोलिसांनी त्यांना कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत त्यांच्या आमरण उपोषणाची परवानगी पूर्णपणे नाकारली होती. परंतु, आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाच्या अजूनही निर्णयावर ठाम आहेत.

Manoj Jarange l मनोज जरांगेंनी घेतला मोठा निर्णय :

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे आता पोलिसांच्या परवानगीशिवाय आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे आज सकाळी दहा वाजता सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. मात्र आता पोलीस त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्व मराठा समाजाच्या नजरा लागल्या आहेत.

यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाच्या ठिकाणाहून रुग्णालयात नेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक मराठा आंदोलक जखमी देखील झाले होते. तेव्हापासून खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटील हे प्रकाशझोतात आले होते आणि आंतरवाली सराटी येथील त्यांचे आमरण उपोषण मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र झाले होते. मात्र आता आजच्या उपोषणावर पोलीस काय करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

News Title – Even after being denied permission Manoj Jarange persisted in his hunger strike

महत्त्वाच्या बातम्या

एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका; ऑनलाईन सेवा बंद राहणार

नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा असणार खास; शपथविधी कधी व किती वाजता होणार?

राज्यात अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाने दिला सतर्क राहण्याचा इशारा

आज या तीन राशींना पैशांची कमी भासणार नाही

‘शेतकऱ्याच्या मुलीने गाल लाल केल्यावर…’; कंगना रणौतच्या प्रकरणात बजरंग पुनियाची उडी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now