EPFO Rule Change | केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना 1995 मध्ये मोठा बदल केलाय. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी सहा महिन्यांच्या आत योजना बंद झाली असेल तर सदस्यांना पैसे मिळत नव्हते. मात्र, आता नवीन नियमानुसार, सहा महिन्यांहून कमी अंशदान केल्याने योजना बंद झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील फायदा होणार आहे.
ईपीएस नियमात सुधारणा करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.सदस्यांनी किती महिने सेवा केली, यावर आधारित आता विड्रॉअल बेनिफीट असणार आहे. या नियमाने पैसे काढणे सोपे होणार आहे. हा नियम बदलण्याने 23 लाखांहून जास्त EPS सदस्यांना लाभ होणार आहे.
EPFO संबंधी ‘हा’ नियम बदलला
प्रत्येक वर्षी लाखो ईपीएस सदस्य पेन्शनसाठी आवश्यक असणारे सलग दहा वर्षे हप्ते न भरताच ही योजना अर्धवट सोडतात. देशात सहा महिन्यांच्या आत नोकरी सोडल्याने ही योजना बंद झालेल्यांची संख्या मोठी आहे. अशा लोकांना पैसे काढता येत नव्हते.मात्र, आता नियम बदलला आहे.
आतापर्यंत विड्रॉअल बेनिफीटचे कॅलक्युलेन संपूर्ण वर्षांत अंशदायी सेवेचा अवधी आणि त्या वेतनाच्या आधारे केले जात होते, ज्यावर ईपीएस अंशदानचे वाटप केले जात होते. अंशदायी सेवा (EPFO Rule Change) सहा महिने किंवा त्याहून अधिक वेळ पूर्ण केल्यानंतरच सदस्यांना पैसे काढता येत होते.
मात्र, अंशदान करण्यापूर्वीच योजना सोडणाऱ्या सदस्यांना कोणताही लाभ मिळत नव्हता. जुन्या नियमांमुळे सहा महिन्यांहून कमी अंशदान सेवा देण्याआधीच योजनेतून बाहेर पडत होते. पण, आता जे ईपीएस सदस्य जे 14.06.2024 पर्यंत 58 वर्षांचे झाले नाहीत, त्यांना आता पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे.
‘अशी मिळते पेन्शन
ईपीएस ही एक पेन्शन योजना असून या योजनेंतर्गत 10 वर्षे योगदान करावे लागते. त्यानंतरच कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुरु होते. यामध्ये सदस्य कर्मचाऱ्याला नोकरी देणारी संस्था आणि ईपीएफ फंडातील कर्मचाऱ्याच्या वेतनातून 12 टक्के अशा दोन समान रक्कमेचे हप्ते जमा केले जातात. कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा संपूर्ण वाटा EPF मध्ये आणि कंपनीच्या योगदानाचे 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन स्कीम ( EPS ) मध्ये आणि 3.64 टक्के दर महिन्याला EPF मध्ये जमा (EPFO Rule Change) केले जाते. कमीत कमी 10 वर्षांची नोकरी पूर्ण केल्यानंतर आणि निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळतो.
News Title- EPFO Rule Change
महत्वाच्या बातम्या-
“खिशात 70 रुपये मग 100 रुपये खर्च करणार कसे?”, शरद पवारांनी अर्थसंकल्पाचा हिशोब काढला
पुण्यासह नगरच्या काही भागांवर रात्री ड्रोनच्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
महत्वाची बातमी! ‘या’ कुटुंबांना वर्षाला 3 मोफत गॅस सिलिंडर मिळणार!
“अजित पवारांची ओरिजनल राष्ट्रवादी”, सुनील तटकरेंच्या विधानावर शरद पवार म्हणाले…






