दोन्ही शिवसेनेमध्ये जोरदार राडा! शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपसात भिडले

On: January 14, 2026 4:18 PM
shivsena (2)
---Advertisement---

Shivsena Clash | महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस उरलेला असताना राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अधिकृत प्रचाराची मुदत संपलेली असतानाही आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण थांबलेले नाही. ठाण्यात तर सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष थेट रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

निवडणूक आयोगाने प्रचार संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी भेटी देण्याची मुभा दिल्याने वाद अधिक चिघळला आहे. या निर्णयावरून विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत, प्रचार संपल्यानंतरही घरोघरी जाऊन प्रचार करण्यास परवानगी देण्यात आल्याने पैशांचे वाटप होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सध्या निवडणुकीपूर्व वातावरण चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray)

ठाण्यात प्रचारादरम्यान धक्काबुक्की :

ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच ठाण्यातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते ईव्हीएम मशीनचा डेमो दाखवत घरोघरी प्रचार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या प्रचाराला विरोध करत, यामागे पैसे वाटपाचा संशय व्यक्त केला. यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली आणि काही वेळातच धक्काबुक्कीपर्यंत प्रकरण पोहोचले.

प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप करताना दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. स्थानिक नागरिकांमध्येही या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. मतदानाच्या अगदी तोंडावर अशा प्रकारची घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे. (Municipal Election Maharashtra 2026)

Shivsena Clash | पोलीस ठाण्यात तणाव, गुन्हा दाखल करण्याची मागणी :

या प्रभागात ठाकरे गटाच्या उमेदवार पूजा आवारे यांच्या विरोधात शिंदे गटाच्या सरिता ठाकूर निवडणूक लढवत आहेत. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, सरिता ठाकूर यांचे पती आणि माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर यांनी प्रचारादरम्यान धक्काबुक्की केली. या घटनेनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते वर्तकनगर पोलीस ठाण्यात पोहोचले असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray)

वर्तकनगर पोलीस ठाण्यात सध्या तणावपूर्ण वातावरण असून, ठाणे महापालिकेचे निवडणूक अधिकारी आणि पोलिसांकडून संपूर्ण घटनेची शहानिशा सुरू आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

News Title : Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Clashes Erupt Between Shiv Sena Workers in Thane Ahead of Municipal Elections

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now