“मी कॉमन मॅन म्हणून काम केलं”, अखेर एकनाथ शिंदेंनी सांगितलं सत्य

On: December 1, 2024 5:03 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath Shinde l विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने बाजी मारली आहे. अशातच आता 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा येथील दरेगाव या मुळगावी गेल्यानं राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली होती. यावेळी एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची देखील चर्चा देखील सुरू आहे. मात्र आता या सर्व घडामोडींवर एकनाथ शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? :;

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे दरेगावला का गेले? तसेच ते नाराज आहेत का? असा सवाल वारंवार उपस्थित करण्यात येत होता. मात्र संदर्भात एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, सत्तास्थापन होत असताना गावी जायचं नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणले की, मी नेहमी गावी येत असतो. मी कॉमन मॅन म्हणून देखील काम केलं आहे. त्यामुळे मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे मला माझ्या मुळगावी आल्यानंतर आनंद होतो. तसेच आपल्या लोकांना भेटल्याचा आनंद देखील मिळतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde l मुख्यमंत्री कोण होणार? :

याशिवाय मुख्यमंत्री कोण होणार? याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घेणार आहेत. त्यामुळे मी कॉमन मॅन म्हणून काम केलं आहे. तसेच लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी देखील काम केलं. त्यामुळे अडीच वर्षांमध्ये आम्ही भरभरून काम केलं असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

News Title :  Eknath Shinde told the reason for going to Daregaon

महत्त्वाच्या बातम्या- 

रोहित शर्माच्या मुलाचं नाव जाहीर!

अजितदादांच टेन्शन वाढणार? युगेंद्र पवारांनी उचललं मोठं पाऊल

‘निवडणुकीसाठीच योजना…’; लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवारांची जाहीर कबुली

महागाईचा अजून एक धक्का! एसटी प्रवास ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार

ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार? ‘या’ बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now