“बिश्नोईला आम्ही खतम करू”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले

On: April 16, 2024 9:25 PM
Eknath Shinde Meet Salman Khan
---Advertisement---

Eknath Shinde Meet Salman Khan  | 14 एप्रिलच्या पहाटे सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन इसमांनी गोळीबार केला. त्यावेळी त्यांनी सलमानच्या घराबाहेर चार ते पाच राऊंड गोळीबार करून ते तिथून निघून गेले. हा गोळीबार पहाटे सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ब्रांचने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सलमानच्या घराबाहेर सुरक्षा तैनात करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सलमानच्या (Eknath Shinde Meet Salman Khan) घरी भेटायला गेले होते.

सलमानची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी बिश्नोई गँगवर भाष्य केलं. आम्ही बिश्नोईला खतम करू. ही मुंबई आहे. कोणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणालेत. (Eknath Shinde Meet Salman Khan)

“आम्ही बिश्नोईला खतम करू”

“हा महाराष्ट्र आहे. ही मुंबई आहे. इथं कोणतीही गँग नाही. कोणतंही अंडरवर्ल्ड नाही. बिश्नोईला आम्ही खतम करू. आरोपी पुन्हा अशी हिंमत करणार नाही कारवाई केली जाईल. हा महाराष्ट्र आहे. इथे पोलीस आहेत. इथे कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. कोणत्याही नागरिकांना कोणी त्रास द्यायचा झाला तर….खरं तर सलमान खान हा मोठा स्टार आहे. त्याच्या कुटुंबाची जबाबदारी ही आमची जबाबदारी आहे. अशी कोणाचीही गँग इथे चालणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. (Eknath Shinde Meet Salman Khan)

“मी सलमान खानची भेट घेऊन आलो. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली. पोलिसांनी आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना भुजमधून अटक केली आहे. ते बिहारचे राहणारे आहेत. त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना येत्या 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीतून सर्वकाही बाहेर येईल,” असं एकनाथ शिंदे म्हणालेत. (Eknath Shinde Meet Salman Khan)

“मी सलमान खानला भेटलो. मी त्याला दिलासा दिला आहे. मी त्याच्या कुटुंबाच्या पाठिशी आहे. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे. पुन्हा असं कोणी धाडस करू नये याची काळजी सरकार घेईल,” असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

News Title – Eknath Shinde Meet Salman Khan

महत्त्वाच्या बातम्या

‘बापासारखं मला…’; भर सभेत विशाल पाटलांच्या डोळ्यात पाणी

सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

सरकारी यंत्रणेद्वारे शिवसेनेचा प्रचार, बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ

राज्यात उष्णतेची लाट; राज ठाकरेंनी सरकारला केलं महत्त्वाचं आवाहन

अभिनेत्रीचं अनोखं फोटोशूट, सोशल मीडियावर नको तसले फोटो व्हायरल…

Join WhatsApp Group

Join Now