मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, सर्व दौरे रद्द

On: October 8, 2024 1:26 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांचे आजचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत. ‘ओव्हर एक्सर्शन’ मुळे आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता मुंबई विमानतळावरून सोलापूरमध्ये होणाऱ्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे येणार होते. (Eknath Shinde)

मात्र, अचानक तब्येत बिघडल्याने त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा प्रचार व प्रसाराचा प्रमुख कार्यक्रम सोलापूर येथे पार पडणार होता. आता देवेंद्र फडणीवस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

एकनाथ शिंदे यांचे आजचे सर्व दौरे रद्द

आज मुंबई म्हाडाच्या घरांचा सोडतीचा कार्यक्रम होणार होता. आज सकाळी या कार्यक्रमाला देखील मुख्यमंत्री शिंदे अनुपस्थित राहिले. हा कार्यक्रमात ते व्ही.सी.द्वारे उपस्थित राहणार होते. हा कार्यक्रम मुंबईतील नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. (Eknath Shinde)

त्यानंतर आज दुपारी 12:30 वाजता मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा प्रारंभ होणार होता. यात ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या प्रचार व प्रसार कार्यक्रमात सामील होणार होते. आता हा दौरा देखील रद्द करण्यात आला आहे. (Eknath Shinde)

News Title :  Eknath Shinde health deteriorated

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

“हरियाणात भाजपचा प्रशासनावर दबाव, खरी आकडेवारी..”; कॉँग्रेसचा गंभीर आरोप

माता सीतेशी स्वतःची तुलना, अभिनेत्री करीना कपूरवर संतापले नेटकरी

‘कोकण हार्टेड बॉय’ नेमका कोण?’ अंकिता वालावलकरने सांगितला लग्नाचा प्लॅन

अजित पवारांना धक्का, कट्टर समर्थक लढवणार अपक्ष निवडणूक?

Join WhatsApp Group

Join Now