शिंदे सरकारची मोठी घोषणा, वारीतील प्रत्येक दिंडीला मिळणार ‘इतके’ हजार रूपये

On: June 14, 2024 8:04 PM
Eknath shinde
---Advertisement---

Eknath Shinde | महाराष्ट्र हे संतांचं राज्य आहे. राज्याला संतांचा इतिहास आहे. यामुळे राज्यात आषाढी कार्तिकी भक्तगण येतात. पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होतात. याचपार्श्वभूमीवर आता राज्यात पंढरपूरला आषाढी वारी येत्या दोन आठवड्यात निघणार आहे. संत तुकारामांची पालखी ही 28 जून तर 29 जून रोजी प्रस्थान होणार आहे. यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) या आषाढी वारीसाठी मोठी घोषणा केली आहे.

वारीतील प्रत्येक दिंडीला 20 हजार रूपये देण्यात येणार

वारीतील प्रत्येक दिंडीला 20 हजार रूपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पंढपूरच्या वारीत संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत राज्यभरात वारकरी सांप्रदाय सामिल होतो. याच दिंडीला आता राज्य सरकारने प्रत्येकी 20 हजार रूपये घेतले आहेत. (Eknath Shinde)

या पालखीत अधिकृतपणे दीड हजार दिंड्या असतात. याचा फायदा आता शेतकरी असणाऱ्या वारकऱ्यांना होऊ शकतो. यासाठी व्यसनमुक्त खात्याकडून हा निधी मुख्यमंत्री उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. आषाढी वारीचे औचित्य साधून सरकारच्या वतीने व्यसनमुक्त दिंडींच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार केला आहे.

व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलन करण्यावर राज्य सरकारचा भर

व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलन करण्यावर या दिडींच्या माध्यमातून सरकारचा भर आहे. यातून वारीतील दिंड्यांना प्रत्येकी 50 हजार रूपयांची मदत देण्याची मागणी होत होती. त्यास विरोधकांचाही पाठिंबा आहे. आता व्यसनमुक्ती खाते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे आहे.

याचमाध्यमातून आता दोन्ही पालखीला (संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर) प्रत्येक दिंडीला 20 हजार रूपये देणगी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

News Title – Eknath Shinde Big Announce About Sant Tukaram Dindi And Sant Dnyaneshwar Dindi

महत्त्वाच्या बातम्या

‘इतका निस्वार्थी भावना असणारा’; तेजस्वी पंडितची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट

घरातून बाहेर पडताना काळजी घ्या; ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ; EPFO ने बंद केली ‘ही’ सुविधा

रिमझिम पावसात लोणावळ्याला जायचा प्लॅन करताय?, मग ‘या’ 17 ठिकाणांना नक्की भेट द्या

पंतप्रधानांना किस करतानाचा मेलोनी यांचा व्हिडीओ व्हायरल!

Join WhatsApp Group

Join Now