ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार घडवणार देवदर्शन, एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

Eknath Shinde | नुकताच महाराष्ट्र अर्थसंकल्प 2024 जाहीर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनांचा वर्षाव केला. लाडकी बहीण योजना, शेतकरी, वारकरी आणि तरूणांसाठी सरकारने योजना लागू केली आहे. तसेच महिलांसाठी देखील योजना जाहीर केल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने या घोषणा केलेल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणारी एक योजना आणली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन लागू करण्यात येईल

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत लक्ष्यवेधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना लागू करण्याची मागणी केली. ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनाला जाण्याची इच्छा असते, पण अर्थिक स्थिती नसल्याने ते जाऊ शकत नाहीत. ही योजना लागू केल्याने ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन लागू करण्यात येईल, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) तीर्थदर्शन योजना लागू केली जाणार असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरू करत असताना नियमावली ठरवू, खर्च आणि इतर बाबी पाहू. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागवू. जे ज्येष्ठ नागरिक देव दर्शनापासून वंचित राहतात त्यांना देवदर्शन घडेल त्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ही योजना सर्व धर्मीयांसाठी असेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सभागृहात सांगितलं.

माध्यमांसोबत बोलत असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, आम्ही काल योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजना, बेरोजगारांसाठी योजना, मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय घेतला. वारकऱ्यांसाठीही निर्णय घेतला. आज आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी आणली होती.

ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी

मुख्यमंत्री ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना आणावी अशी मागणी त्यांनी केली होती. ज्या ज्येष्ठ नागरिकांना देव दर्शनाची इच्छा असते. पण सर्वांना उतरत्या वयात अर्थिकदृष्ट्या देवदर्शन करणं परवडत नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. चार धाम, हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्धांची तीर्थक्षेत्र आहेत. हज यात्रेला जातात तसं इतर धर्मीय आपल्या तीर्थक्षेत्राला जात असतात. पण ज्येष्ठांना अर्थिक अडचणीमुळे  जाता येत नाही. अशा व्यक्तींना आता तीर्थदर्शन करता येणार आहे.

News Title – Eknath Shinde Announcement About New Scheme For Senior Citizen For Dev Darshan yatra

महत्त्वाच्या बातम्या

शत्रुघ्न सिन्हांची प्रकृती बिघडली?, लेक सोनाक्षी आणि जावई झहीर यांनी घेतली भेट

पेन्शन संदर्भात सरकारने ‘हा’ नियम बदलला; लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदाच फायदा

“खिशात 70 रुपये मग 100 रुपये खर्च करणार कसे?”, शरद पवारांनी अर्थसंकल्पाचा हिशोब काढला

पुण्यासह नगरच्या काही भागांवर रात्री ड्रोनच्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

महत्वाची बातमी! ‘या’ कुटुंबांना वर्षाला 3 मोफत गॅस सिलिंडर मिळणार!