जळगाव | आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा अजूनही भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. पण त्याआधीच त्यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसेंची सर्वात मोठी घोषणा
रावेरची निवडणूक जाहीर झाल्यापासून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं सूचित केलं होतं. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे भाजपचा प्रचार करावा, तसेच रक्षा खडसे माझ्या सून आहे. या दोन्ही भूमिकेतून मी भाजपचा प्रचार करत आहे. निवडणूक भाजप लढवत आहे. मी जोडीला मदत करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
माझ्या कन्येचं लग्न झालं आहे. पण ती रोहिणी खडसे असं नाव लावते. ते योग्यच आहे. तो तिला अधिकार आहे. पण सध्या ती दुसऱ्या पक्षात काम करत आहे. त्यामुळे तिच्या राजकीय भवितव्याचा निर्णय घेण्याचा तिचा तिला अधिकार आहे. पण मी मात्र भाजपसोबत असून माझ्या सुनेचा प्रचार करत आहे, असं एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटलं आहे.
रावेर लोकसभेच नियोजन भाजपने आधीच केलं आहे. आता मी सुद्धा मतदारसंघ पिंजून काढला आहे. रक्षा ताईसाठी आता एकत्र काम करतोय. मला मतदारसंघ चांगला माहीत आहे. भाजपमध्ये असताना माझ्याच नेतृत्वात या मतदारसंघाच्या निवडणुका लढवल्या गेल्या. या मतदारसंघातील प्रत्येकाला मी नावानिशी ओळखतो. इथलं जातीय समीकरण मला माहीत आहे. गावागावातील लोकांशी ओळख आहे. त्याचा फायदा रक्षा खडसे यांना होईल, असं एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले.
Eknath Khadse | “त्याबाबत मी निश्चिंत आहे”
भाजपचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की, नाथाभाऊंचा भाजप प्रवेश होईल. म्हणून मी त्याबाबतीत निश्चिंत आहे, असंही खडसेंनी स्पष्ट केलं. मी भाजपमध्ये येणार या मुद्द्यावर काही लोकांची नाराजी होतीच. एवढे वर्ष सोबत काम केले होते. म्हणून सर्व गुणगान करतील असं होत नाही. काही लोक दुखावले जातात, त्यांच्या नाराजीचा परिणाम अशा गोष्टींवर होत असतो. जे नाराज आहेत, त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न मी करत आहे, एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) सांगितलं आहे.
हे मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते, मात्र, आता माझे निवडणूक लढवण्याकडे कल नाही. शरद पवारांना पक्ष सोडताना काय सांगितले, हे आता सांगणार नाही, काही गोष्टी माझ्यासाठी राखीव राहू द्या, असंही ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
गुड न्यूज! ‘या’ चार बँका एफडीवर देतायत भरघोस व्याज
नवव्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने तोंड उघडलं, सगळं खरं खरं सांगून टाकलं
बीडमध्ये कोण निवडून येणार?; मनोज जरांगेंचं भाकीत
क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल होणार?, जय शहा निर्णय घेण्याच्या तयारीत
“फडणवीस राजकारणातील कच्च मडकं, त्यांना..”; संजय राऊतांची खोचक टीका






