ईद-ए-मिलादची सुट्टी 16 ऐवजी ‘या’ तारखेला मिळणार; सरकारने केला मोठा बदल

On: September 14, 2024 5:05 PM
Eid-e-Milad Holiday
---Advertisement---

Eid-e-Milad 2024 l ईद-ए-मिलादच्या सुट्टी संदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ईद-ए-मिलादची सुट्टी 16 सप्टेंबरऐवजी 18 सप्टेंबरला देण्यात येणार आहे असा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. ईद-ए-मिलाद 16 सप्टेंबरला आहे आणि गणपती विसर्जन 17 सप्टेंबरला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ईद-ए-मिलादची सुट्टी 16 सप्टेंबरऐवजी 18 सप्टेंबरला करावी अशी मागणी केली होती. (maharashtra government eid holiday)

सरकारने ईदच्या सुट्टीमध्ये केला मोठा बदल :

17 सप्टेंबरला गणेश विसर्जन असल्याने ईद-ए-मिलादची सुट्टी 16 सप्टेंबरऐवजी 18 सप्टेंबरला देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते नसीम खान यांनी केली होती. कारण दोन्ही समाजाचे सण चांगले जावेत आणि या दोन्ही सणाचे पावित्र्य अबाधित रहावे व हिंदू-मुस्लिम बंधुभाव अबाधित रहावा त्यामुळे ईदची सुट्टी 16 सप्टेंबरऐवजी 18 सप्टेंबरला सुट्टी द्यावी अशी म्हणी करण्यात आली होती.

अशातच आता यासंदर्भात राज्य सरकारने 16 सप्टेंबरची सुट्टी 18 सप्टेंबरला जाहीर केली आहे. अशातच आता एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ संदेश देखील जारी केला होता की, खिलाफत समितीने आयोजित केलेल्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीसंदर्भात बैठक झाली होती. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजच्या भावना लक्षात घेऊन एक दिवस दारूबंदी जाहीर करावी, अशी मागणी सरकारकडे केली होती.

Eid-e-Milad 2024 l इतर जिल्ह्यातील ईदच्या सुट्टीसंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्याऱ्यांनी निर्णय घ्यावा :

यासंदर्भात मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीची तारीख विचारात घेऊन 16 सप्टेंबर 2024 ची जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा याव्यतिरिक्त ती सुट्टी रद्द करून बुधवार, दि. 18 सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. तसेच यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्याऱ्यांनी हा निर्णय घ्यावा असा आदेश देखील राज्य सरकारने काढला आहे. (maharashtra government eid holiday)

News Title : Eid-e-Milad 2024

महत्त्वाच्या बातम्या-

सोन्याची भरारी! हजारो रुपयांनी महागलं; काय आहेत आजचे भाव?

आजपासून ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार; तुमच्या शहराचं नाव आहे का तपासा?

विधानसभा निवडणुकीसाठी ‘या’ 18 जागांवर काँग्रेस आग्रही, पाहा यादी!

आज या दोन राशीवर शनीची कृपा राहणार; मिळणार आनंदाची बातमी

कोणते लोक हृदयविकाराचा झटका येऊनही मरत नाहीत? जाणून घ्या यामागील शास्त्र

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now