मुंबई | राज्यातील महाविकास आघाडीच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे ईडी(ED) हात धुवून लागली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि कागल मतदारसंघाचे माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुणे येथील घरावर हे छापे टाकण्यात आले आहेत. घराबाहेर कडक असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्या आरोपांनंतर ही धाड टाकण्यात आली आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यासंबंधी ही धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे.
आज सकाळी ईडीचे पथक मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झालं आहे. सकाळपासूनच मुश्रीफांच्या घराची तपासणी सुरु आहे. हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांना ही बाबकळताच मुश्रीफांच्या घराबाहेर समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या






