Multistate Fraud l राज्यात जास्तीच्या व्याजाचे अमिष दाखवत फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. आता राज्यात असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे. राज्याबाहेर जाळे पसरलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीने कारवाई केली आहे. या मल्टीस्टेटने नागरिकांना जास्तीच्या व्याजाचे अमिष दाखवत फसवणूक केल्यामुळे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आता ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीने कारवाई केली आहे.
या मल्टीस्टेटवर ईडीने केली कारवाई :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर, बीड, मुंबई व पुण्यातील शाखांमधून ठेवीदारांचे कोट्यवधी बुडवल्याचे आरोप ज्ञानराधा मल्टीस्टेटवर करण्यात आले होते. त्यानंतर आता या पतसंस्थेवर ईडीने कारवाई केली असून या चारही शाखांमधील तब्बल 95 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे राज्यासह बाहेर देखील मोठ्या प्रमाणात जाळे पसरलेले आहे. गेल्या वर्षभरापासून ही मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पैसे अडकलेले आहेत. या मल्टीस्टेट घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार हे सुरेश कुटे यांची मागील महिन्यात ईडीकडून कसून चौकशी देखील करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आता केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयानंतर बीड, पुणे, छत्रपती संभाजीनगर व मुंबई या शाखांमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
Multistate Fraud l ईडीकडून 102 कोटींची मालमत्ता केली जप्त :
याप्रकरणी ईडीकडून आत्तापर्यंत तब्ब्ल 102 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच या चारही शाखांमधून जवळपास 95 कोटी रुपयांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली आहे. यामध्ये या चारही शाखांमधील फ्लॅट, प्लॉट, व्यावसायिक कार्यालय अशी एकूण 85 कोटी 88 लाख रुपये किमतीची स्थावर मालमत्ता तसेच इतर मालमत्ता अशी एकूण मिळून 95 कोटी एक लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संस्थापक सुरेश कुटे व इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रींगच्या प्रकरणात ही थेट कारवाई करण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील हजारांहून अधिक ठेवीदारांच्या ठेवी बुडवून हाँगकॉंगला पळवल्याचा ठपका असणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉ ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर केंद सरकारने महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय केंद्र सरकारने गुंतवणूकदारांच्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेत या पतसंस्थेसाठी लिक्विडेटर नेमण्याचे निर्देश दिले आहेत.
News Title : ED action on Dyanradha Multistate
महत्वाच्या बातम्या-
बिग बॉस मराठी 5 च्या विजेत्याचं नाव समोर! सोशल मीडियावर चर्चेला उधाण
परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो व रेड अलर्ट जारी
ऑक्टोबर महिन्यात ‘या’ राशींचं नशीब फळफळणार, शनीदेव करणार धनवर्षाव
सोनं झालं महाग, भाव गेला 80 हजारांवर?; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर
उर्मिला मातोंडकरचा संसार मोडणार, लग्नाच्या 8 वर्षांनी घेणार घटस्फोट?






