पहाटे फक्त 20 मिनिटे चालण्याने काय होईल?, उत्तर ऐकून हैराण व्हाल

On: July 6, 2024 6:47 PM
Morning Walk Tips
---Advertisement---

Early Morning Walk benefits | सध्याच्या काळात तरुण असो किंवा वृद्ध सगळ्यांनाच आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. बदलती जीवनशैली तसेच खाण्या-पिण्याच्या काही सवयी या मनुष्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत असतात. आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या की, मग बरेच जण डाएट करतात.

तर, कुणी जीम लावतात. वेगवेगळे उपचार घेतात. मात्र, तुम्हाला महितीये का, रोज पहाटे फक्त 20 मिनिटे चालल्याने तुमच्या शरीराला किती फायदे मिळतात?, याचं उत्तर ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. कारण, रोज पहाटे चालण्याचे अनेक फायदे आहेत.

पहाटे चालण्याचे फायदे

अनेक आजारांपासून बचाव : जर तुम्ही रोज सकाळी चालत असाल तर तुमचा अनेक गंभीर आजारांपासून धोका कमी होतो. मॉर्निंग वॉक केल्याने टाईप 2 मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि काही प्रकारचे कर्करोग यासारखे गंभीर आजार टाळता येतात.

हाडे आणि सांधे मजबूत होतात : जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपल्या हाडांची डेंसिटीही कमी होऊ लागते, ज्यामुळे ते कमकुवत होतात. अशाप्रकारे, निरोगी आहारासोबत चालणे आपली हाडे मजबूत करण्यास आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

वजन कमी करण्यास उपयुक्त : पहाटे फक्त 20 मिनिटे मध्यम (Early Morning Walk benefits) वेगाने चालणे देखील वजन कमी करण्यास मदत करते. दररोज अर्धा तास चालल्याने 150 कॅलरीज बर्न होतात आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचे वजन देखील कमी करू शकता.

मानसिक आरोग्य सुधारते : दररोज सकाळी चालल्याने तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते. चालणे तुमचा मूड सुधारण्यास, तणाव, चिंता, थकवा आणि नैराश्याची लक्षणे कमी करण्यात मदत करू शकते.

ऊर्जा पातळी वाढवते : सकाळी लवकर उठून (Early Morning Walk benefits) बाहेर फिरण्याने तुमच्या एनर्जी लेव्हलवर मोठा प्रभाव पडतो.एका प्रसिद्ध अभ्यासानुसार, 20 मिनिटांचा मॉर्निंग वॉक घेतलेल्या शरीराला ऊर्जा मिळते.

News Title –  Early Morning Walk benefits

महत्त्वाच्या बातम्या-

ठरलं! ‘या’ तारखेला मांडलं जाणार देशाचं बजेट; सर्वसामान्यांसाठी होणार मोठ्या घोषणा?

“सरकारला रोष परवडणार नाही, मराठ्यांना कमजोर समजू नका”; जरांगे पाटील यांचा इशारा

हार्दिक-नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला पुन्हा जोर; पत्नीला सोडून पांड्या चक्क..

काळजी घ्या! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

ग्राहकांना दिलासा! सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोनं फक्त..

Join WhatsApp Group

Join Now