पुण्यात बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमस्थळी राडा, कारण आलं समोर

On: November 22, 2023 12:36 PM
---Advertisement---

पुणे | बागेश्वर महाराज यांचा कार्यक्रम पुणे येथे पार पडणार आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी बागेश्वर महाराज यांचा कार्यक्रम  संगमवाडी परिसरात आयोजित करण्यात आला आहे. बागेश्वर महाराज यांच्या कार्यक्रमासाठी अनेकजण विरोध करत आहेत.

पुण्यातील संगमवाडी येथील निकम फार्म, या ठिकाणी बागेश्वर महाराज यांच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमात स्वयंसेवक आणि भक्त यांच्यात तूफान वाद झाल्याचं समोर आलं.

काय आहे नेमका प्रकार?

कार्यक्रमानिमित्त बागेश्वर महाराज सध्या पुण्यात आहेत. शिवाय त्यांचा पुणे दौरा देखील सुरु आहे. त्यांच्या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.

बागेश्वर बाबा यांना भेटण्यासाठी अनेक भक्त दरबारात येत असतात. यावेळी आलेल्या भक्तांचे आणि स्वयंसेवकांमध्ये हमरीतुमरी झाली. त्याचं परिवर्तन हाणामारीमध्ये झालं.

स्वयंसेवक आणि भक्तांमध्ये हाणामारी झाली आहे. पोलिसांच्या मदतीने वाद मिटवण्यात आल्याचं कळतंय. दरम्यान एका कार्यक्रमात बागेश्वर महाराज यांनी काही दिवसांपूर्वी तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी सुद्धा ते वादाच्या भवऱ्यात अडकले होते.

थोडक्यात बातम्या- 

जरांगेंनी केला नवा खुलासा; राजकीय वर्तुळात खळबळ

पुण्यात धडकी भरवणारा अपघात, पाहा व्हिडीओ

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका! 

मोठा गौप्यस्फोट: ललित पाटील प्रकरणात ‘या’ बड्या नेत्यांची नावं 

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now