आता मद्यधुंद होत गाडी चालवल्यास थेट लायसन्स होणार रद्द; ‘या’ शहरात घेण्यात आला मोठा निर्णय

On: July 10, 2024 1:28 PM
Drunk Driver Punishment
---Advertisement---

Drunk And Drive | पुणे हिट अँड रन प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट आहे. पुणे कल्याणीनगर येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणामुळे राज्यातील लोकांच्या मनात संताप आहे. पुणे शहरात एका हिट अँड रन प्रकरणानंतर अनेक हिट अँड रन प्रकरण समोर आले. त्यानंतर नुकतेच मुंबईतील वरळी येथे देखील हिट अँड रन प्रकरण सर्वांच्या समोर आलं आहे. यामुळे आता वाहन चालवत असताना एखाद्या व्यक्तीने मद्यधुंद होत वाहन चालवलं तर त्याला आता मोठा फटका बसणार आहे.

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याने परवाना रद्द होणार

हिट अँड रन प्रकरणासोबत ड्रंक अँड ड्राईव्हवर देखील पोलीस आपले डोळे ठेवून आहेत. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यास आता वाहनचालकाचा परवाना रद्द होणार असल्याची शक्यता आहे. यामुळे आता तळीरामांची तंबी उडणार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता कोणत्या शहरात मद्यधुंद होत वाहन चालविता येणार नाही, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर असून सांस्कृतिक राजधानी आहे. मात्र या पुणे शहरात वाढणाऱ्या ड्रंक आणि ड्राईव्हच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता कठोर पाऊलं उचलली आहेत. पुणे शहरात मागील सहा महिन्यांपासून 1684 जणांवर ड्रंक आणि ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवल्यास त्यांच्यावर केवळ खटले पाठवून कारवाई केली जाते.

वाहन चालवत असताना एखादा वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असेल तर त्याचा सुरूवातीला 3 महिने परवाना रद्द करण्यात येईल. तसेच त्यानंतर पुन्हा एकदा जर अशीच घटना घडली तर 6 महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार. मात्र, तिसऱ्या वेळी पुन्हा तिच व्यक्ती आढळून आल्यास त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.

हिट अँड रन प्रकरणाने राज्यात संतापाची लाट

पुण्यात काही महिन्यांआधी पोर्शे अपघात प्रकरणी कल्याणीनगर येथे एक युवक आणि एका युवतीला आरोपीने धडक देऊन अपघात केला. त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. त्यानंतर या रविवारी पुण्यातील बोपोडीत हिट अँड रन प्रकरण घडले. तसेच आता नुकतेच मुंबईतील वरळी येथे हिट अँड रन प्रकरण झालं आहे.

News Title – Drunk And Drive Pune News Marathi News Update

महत्त्वाच्या बातम्या

कार खरेदी करायचीयं? तर येत्या काळात तुमच्यासमोर आहेत ‘हे’ बेस्ट ऑप्शन

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

आज ‘या’ 2 राशींचे नशीब पालटणार!

टीम इंडियाला मिळाला नवा हेड कोच; ‘या’ माजी खेळाडूवर टाकली संघाची जबाबदारी

टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघातील ‘या’ खेळाडूला मिळणार घर आणि सरकारी नोकरी!

Join WhatsApp Group

Join Now