Rahul Dravid l चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या थरारक सामन्यात अंतिम क्षणी घडलेल्या एका निर्णयामुळे सामना पूर्णपणे पलटला. अनुभवी महेंद्रसिंह धोनी मैदानावर असताना सर्वांना विजयाची आशा होती, मात्र राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केलेल्या स्मार्ट निर्णयामुळे चेन्नईला 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
सामना शेवटच्या टप्प्यावर असताना चेन्नईला विजयासाठी 39 धावांची आवश्यकता होती. मैदानावर धोनी आणि रविंद्र जडेजा हे अनुभवी फलंदाज उपस्थित होते. त्यामुळे विजयाचे गणित सोपे वाटत असताना, द्रविडने वेगळाच डाव खेळला. त्याने इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरचा उपयोग शेवटच्या ओव्हरपर्यंत न करता, त्याला 18 किंवा 19 व्या ओव्हरमध्येही चेंडू देण्याचे टाळले.
द्रविडचा मास्टरस्ट्रोक ठरला निर्णायक :
जोफ्रा आर्चरने या सामन्यात उत्कृष्ट सुरुवात केली होती. त्याने सामन्याची पहिली ओव्हर मेडन टाकून रचिन रवींद्रचा महत्वाचा बळी घेतला होता. त्याच्या तिन्ही ओव्हरमध्ये केवळ 13 धावा झाल्या होत्या. मात्र द्रविडने त्याला राखून ठेवत, 18 वी ओव्हर तुषार देशपांडेला दिली. या ओव्हरमध्ये 19 धावा गेल्या, पण द्रविडचा प्लॅन तिथेच संपला नव्हता.
19 व्या ओव्हरला धोनी आणि जडेजाकडून जलद धावा होण्याची शक्यता होती, पण त्याऐवजी द्रविडने संदीप शर्माकडे शेवटची ओव्हर सोपवली. संदीपने धोनीचा बळी घेत सामन्याचा निकालच बदलून टाकला. त्या ओव्हरमध्ये फक्त 13 धावा गेल्याने चेन्नईला फक्त 176 धावांवर थांबावं लागलं आणि राजस्थानने सामना 6 धावांनी जिंकला.
Rahul Dravid l धोनीच्या हिशोबात गडबड, द्रविडने जिंकला डाव :
धोनीने नेहमीप्रमाणे सामन्याचा शेवट स्वतः करण्याची जबाबदारी घेतली होती. मात्र द्रविडने त्याच्या रणनीतीवर मात करत सामन्याची दिशा बदलून टाकली. जोफ्राला धोनी आणि जडेजाच्या समोर न आणण्याचा निर्णय एकदम अचूक ठरला.
या विजयामुळे राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 मध्ये पहिला विजय मिळवला असून, त्यांनी आपलं विजयाचं खातं उघडलं आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जसाठी हा पराभव निराशाजनक ठरला आहे, विशेषतः जेव्हा धोनीसारखा मॅच फिनिशर शेवटपर्यंत खेळत होता.






