महाराष्ट्राला हादरवणारा खुलासा समोर; माजी जिल्हाधिकाऱ्यांनी उघड केले काळे कारनामे

On: December 24, 2024 7:13 PM
Vaibhavi Deshmukh
---Advertisement---

Beed | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुळे हत्याकांडामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय परिस्थिती सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर, बीडचे माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे जो राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजवणारा आहे.

माजी जिल्हाधिकाऱ्यांचा धक्कादायक खुलासा

सदानंद कोचे यांनी एका मुलाखतीत बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि खंडणीप्रकरणे वाढत आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांचं जीवन अत्यंत कठीण झालं आहे. बीड हे बिहारपेक्षा वाईटच आहे. हे 2011 ला मला सांगण्यात आलेलं. माझ्या काळात दर एक दोन दिवसाला खून होणार, बलात्कार रोज होणार आणि हाणामारीही रोजच. त्याला काही मर्यादा नाही. एक IPS अधिकारी तर बदली झाल्यानंतर महिन्याभरातच गायब झालेले. ते अजूनपर्यंत सापडलेले नाहीत, अशी खुलासा माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी केलाय.

लोकशाही बीडची पुस्तकात काय?

सदानंद कोचे यांनी एक पुस्तक देखील लिहिलं आहे. त्याचं नाव लोकशाही बीडची असं आहे. संतोष देशमुख प्रकरणामुळे हे पुस्तक देखील चर्चेत आलं आहे. या पुस्तकात बीड जिल्ह्यातील राजकीय नेते आणि अधिकारी यांच्यातील संबंध आणि त्याचा प्रशासनावर होणारा परिणाम याबाबत कोचे यांनी तपशीलवार माहिती दिली आहे. त्यांनी असं सूचित केलं आहे की काही राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांमध्ये सांठगाठ असल्याने गुन्हेगारी वाढत आहे आणि न्याय मिळवणं दुर्मिळ झालं आहे. यामुळे लोकशाही मूल्ये आणि न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरण

सदानंद कोचे यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा संदर्भ देताना असं म्हटलं आहे की या प्रकरणातील आरोपींना लवकर अटक करण्यात आली पण त्यामागचं राजकीय आणि प्रशासकीय संबंध समोर आणणं आवश्यक आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे जेणेकरून असे गुन्हे पुन्हा घडू नयेत.

कायदा आणि सुव्यवस्था

बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय यंत्रणांना अधिक सक्रिय आणि पारदर्शक बनावं लागेल, असं कोचे यांनी सांगितलं. त्यांनी असंही नमूद केलं की गुन्हेगारी रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे पुरावे समोर! ‘या’ व्यक्तीने सातबारेच केले शेअर

1500 की 2100; लाडक्या बहिणींच्या खात्यावर किती रुपये जमा होणार?

“तिच्याशिवाय मी राहूच शकत नाही…”, विवेक ओबेराॅयने सांगितलेली ‘ती’ महिला कोण?

‘बंदोबस्त करणार’! मंत्री होताच नितेश राणेंनी दिला इशारा?

‘महाजन साहेब मलाही पक्षात घ्या’, ठाकरेंचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now