Disadvantages of Too Much Salt | जेवणात मीठ नसलं तर त्याला चव येत नाही. खूप सारे मसाले, भाज्या आणि सामुग्री वापरली पण त्यात मीठच टाकले नाही तर त्या पदार्थाला चव येतच नाही. त्यामुळे मीठ हा जीवनावश्यक घटक आहे. मात्र, त्याचं प्रमाण जर आवश्यकतेनुसार अधिक झालं तर त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होत असतो.
मीठ हे आपले अन्न आणि आरोग्य दोन्हीसाठी आवश्यक आहे. अन्नाची चव वाढवण्यासाठी मुख्यतः मीठ वापरले जाते.यामध्ये असलेले सोडियम आरोग्यासाठीही आवश्यक आहे. मात्र, जास्त मीठ खाणे आरोग्यदायी असलं तरी त्यामुळे त्वचेलाही नुकसान होऊ शकते. अलीकडेच याबाबतचा एक रिसर्चही समोर आला आहे.
जास्त मीठ खाण्याने त्वचेला नुकसान
मीठामध्ये सोडियम हा मुख्य घटक असतो, जो आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. पण, त्याचा मर्यादित प्रमाणात वापर करणे फायदेशीर ठरते. जास्त मीठ वापरल्यास शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील (WHO) याबाबत नेहमीच सतर्क केलं आहे.
नवीन संशोधनानुसार, (Disadvantages of Too Much Salt) शरीरात अधिकची सोडियम पातळी एक्जिमाचा धोका वाढवू शकते. जर्नल ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह डर्माटोलॉजीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, फक्त एक ग्रॅम अतिरिक्त सोडियम खाल्ल्याने एक्जिमा भडकण्याची शक्यता 22 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
व्यक्तीने किती मीठ खायला हवं?
एक्जिमा ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये तुमच्या त्वचेला नुकसान होते. यामुळे तुमची त्वचा ओलावा टिकवून ठेवू शकत नाही आणि (Disadvantages of Too Much Salt) बाह्य घटकांपासून शरीराचे संरक्षण करू शकत नाही. यामुळे त्वचा कोरडी, खडबडीत होते. यालाच एटोपिक डर्माटायटीस असंही म्हणतात.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दररोज 2000 मिलीग्राम पेक्षा कमी सोडियम खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय डब्ल्यूएचओ आयोडीनयुक्त मीठ खाण्यासही प्रोत्साहन देते. जास्त मीठ खाल्ल्याने इतरही गंभीर आजार होऊ शकतात.यामुळे ब्लड प्रेशर वाढते, किडनी खराब होते. त्यामुळे कमी मीठ खाल्लेलं शरीरासाठी कधीही फायदेशीर ठरते.
News Title : Disadvantages of Too Much Salt
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! भरधाव कारने महिलेला उडवलं,24 तासांनंतरही गुन्हा नाही
सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी; नाराज छगन भुजबळ म्हणाले…
मोठी बातमी! एकाच दिवशी 5 बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं
ग्राहकांना दिलासा! सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण
मोठी बातमी! मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला नवा अल्टीमेटम






