स्मृतीने पलाश मुच्छलला कोरिओग्राफरसोबत रेड हँड पकडले? बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा गौप्यस्फोट!

On: November 26, 2025 2:05 PM
Palash Muchhal
---Advertisement---

Palash Muchhal Chat Leak | टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांच्या लग्नावर पुन्हा एकदा वादळ आलं आहे. आधीच तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने हे लग्न स्थगित करण्यात आलं. पण आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आरोपांमुळे हा विषय अधिकच गंभीर बनला आहे. स्मृती–पलाशच्या (Palash Muchhal) लग्नाचे समारंभ सुरू असतानाच, पलाशच्या कथित फ्लर्टी चॅटचे स्क्रीनशॉट समोर आले. मात्र त्याहूनही धक्कादायक दावा आता बॉलिवूड अभिनेता केआरकेकडून केला जात आहे. (Palash Muchhal Chat Leak)

सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांत या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून ना स्मृतीनं, ना पलाशनं कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. मात्र या चर्चांनी चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण केला आहे. दरम्यान, स्मृतीनं तिच्या सोशल मीडियावरून लग्नासंबंधित सर्व पोस्ट डिलिट केल्याने संशय आणखी वाढला आहे.

कथित फ्लर्टी चॅट व्हायरल; लग्न का पुढे ढकललं यावर नवे प्रश्न :

23 नोव्हेंबर रोजी विवाहसोहळा होणार होता. संगीत रात्री स्मृतीच्या वडिलांना अचानक हार्ट अटॅक आला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामुळे लग्न पुढे ढकलल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. पण समारंभ रद्द झाल्यानंतर लगेचच पलाश मुच्छल आणि मेरी डिकोस्टा नावाच्या महिलेतील कथित चॅटचे स्क्रीनशॉट इंस्टाग्रामवर व्हायरल झाले. (Palash Muchhal Chat Leak)

या स्क्रीनशॉटमध्ये पलाश कथितरीत्या फ्लर्टिंग करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे स्क्रीनशॉट शेअर होताच, सोशल मीडियावर स्मृतीच्या नात्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा वेगाने पसरली. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांनी मौन बाळगलं असलं तरी चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Palash Muchhal Chat Leak | केआरकेचा धडाकेबाज दावा :

या चर्चेला अधिक हवा देणारी पोस्ट बॉलिवूड अभिनेता आणि समीक्षक केआरके (कमाल आर खान) याने ट्विट करून केली. त्याने दावा केला की स्मृतीने स्वतः लग्नाच्या समारंभातच पलाशला एका कोरिओग्राफर मुलीसोबत “रंगेहाथ पकडलं”. केआरकेनं पलाशबाबत अत्यंत कठोर शब्द वापरत म्हटलं की, “हा फक्त प्रसिद्धीसाठी स्मृतीशी लग्न करत होता”.

केआरकेच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा भडका उडाला. अनेकांनी या दाव्याची सत्यता विचारत प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी पलाशवर टीका केली. मात्र हा आरोप कितपत खरा आहे याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

दरम्यान, स्मृती मानधनानं (Smriti Mandhana) तिच्या इंस्टाग्रामवरून लग्नासंबंधित सर्व फोटो, पोस्ट डिलिट केल्या आहेत. तिच्या जवळच्या मैत्रिणीनंही पलाशला (Palash Muchhal) अनफॉलो केल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली आहे. हे सर्व योगायोग आहेत का, की काहीतरी मोठं खरंच घडलं? याबाबत सर्वांचंच लक्ष आता मानधना आणि मुच्छल यांच्या अधिकृत वक्तव्याकडे लागलं आहे.

News Title: Did Smriti Mandhana Catch Palash Muchhal Red-Handed? Bollywood Actor KRK Makes Explosive Claim

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now